नांदेड : लोकसहभागातून जपला जातोय ऐतिहासिक वारसा; कुरुळा येथील हेमाडपंथी शिवपार्वती मंदिराचा जिर्णोद्धार

file photo
file photo

कुरुळा ( जिल्हा नांदेड ) : भूतकाळात कधीकाळी वैभव असलेल्या पुरातन वास्तू या वर्तमान काळासातील वारसा हा अनमोल ठेवा असतात. सद्यस्थितीत बऱ्याच वास्तूंची दुर्लक्षामुळे इच्छाशक्तीच्या अभावामुळे पडझड झालेली असते. अशाच पडझड होण्याच्या मार्गावर असलेल्या कुरुळा येथील हेमाडपंथी शिवपार्वती मंदिराचा जीर्णोद्धार होत असून त्याचे जतन आणि संवर्धन होण्याकरिता नागरिकानी पुढाकार घेतला आहे.

कुरुळा येथील उत्तर दिशेला पंचक्रोशीतील सर्वात प्राचीन वास्तू अशी ओळख असलेले भवानी माता मंदिर आहे. भाविकांचे श्रद्धास्थान असल्यामुळे श्रावण मास, शिवरात्री मास आणि तत्सम पर्वावर जाज्वल्य देवस्थान म्हणून याठिकाणी भाविकांची दर्शनासाठी गर्दी होते. मंदिर बांधकामाची रचना यादवकालीन आणि स्थापत्यशैलीवरुन हे मंदिर इ. स. १००० च्या दरम्यानचे असावे असे समजते. यामुळे कुरुळा गावास ऐतिहासिक महत्व प्राप्त होते. मंदिरातील गर्भगृहात प्रवेश केल्यानंतर मंदिर झुकल्याचा भास व्हायचा. गर्भगृहातील उभे असणारे सुंदर आणि सुबक नक्षीकाम असणारे खांब तत्कालीन भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात झुकल्याने मंदिर कोसळण्याची शंका उपस्थित केली जात होती. 

दरम्यान यासंदर्भात भाविकांनी शिवैक्य डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिरच्या पुनर्रउभारणीसाठी निधी संकलित करण्याचा निर्धार केला आणि गावातील ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी गाव एकवटला. काम जिकरीचे असल्याने लाखो रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यंत्राच्या साहाय्याने मंदिराच्या दगडी शिळा बाजूला काढण्यात आल्या असून त्यावरील कृत्रिम रंग वेगळा केला जात आहे. मंदिर उभारणीच्या कामाला वेग येत असून भाविकांचे श्रद्धास्थान असल्याने भाविक आर्थिक मदत करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. परंतु अद्यापही उदासीन लोकप्रतिनिधीकडून या मंदिरासंदर्भात पुरातत्व विभागात नोंद होऊन मदत व्हावी यासाठी साधा कागदी पाठपुरावासुद्धा केला नाही ही चिंताजनक बाब असल्याचे बोलले जात आहे.

सकाळने केला होता पाठपुरावा

मंदिराची होत असलेली पडझड आणि झुकलेली स्थिती यासंदर्भात सकाळच्या माध्यमातून वेळोवेळी वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. इच्छाशक्तीचा अभाव असणाऱ्या लोकप्रतिनिधीनी याकडे दुर्लक्ष केलं परंतु गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन प्रत्यक्ष मंदिर जिर्णोद्धाराच्या कामाला सुरवात केली आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com