esakal | नांदेड : कोरोनाचा उद्रेक असताना पाच दिवसापासून दापका (गुं) येथील दवाखाने बंद

बोलून बातमी शोधा

रुग्णालय दापका गुंडोपंत
नांदेड : कोरोनाचा उद्रेक असताना पाच दिवसापासून दापका (गुं) येथील दवाखाने बंद
sakal_logo
By
विनोद आपटे

मुक्रमाबाद (जिल्हा नांदेड) : देशात कोरोनाचा वाढता प्रर्भाव पाहता सर्वच ठिकाची शासकीय व खासगी दवाखाने २४ तास चालू ठेवून रुग्णांना सेवा देण्याचे केंद्र व राज्य शासनाचे आदेश असताना माञ मुखेड तालुक्यातील दापका (गुं) येथील खासगी डॉक्टरांनी शासनाच्याच या अत्तिमहत्वाच्या आदेशालाच केराची टोपली दाखवत कोरोनाचे रुग्ण वाढल्याचे कारण पुढे करत गेल्या पाच दिवसापासून आपली दवाखाने बंद ठेवली. त्यामुळे येथील नागरिक डॉक्टरांच्या या निर्णयामुळे भयभीत झाले आहेत. तर गावच्या सरपंच याचे पती डॉक्टर हे पण या बंदमध्ये सामील आहेत.

मुखेड तालुक्यातील दापका (गुं) हे, एक महत्त्वाचे व मध्यवर्ती ठिकाण असून याठिकाणी परीसरातील व लातुर जिल्ह्यातील अनेक गावांचा रोजचा कोणत्याना कोणत्या कारनाने संबंध येत असतो. कोरोना या महामारीने आता गावागावात आपले बस्तान मोठ्या प्रमाणात मांडले असून गाव. वाडी, तांड्यावर रोज मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळत आहेत. त्यात दापका (गं) हे, गाव कोरोनाचे हॉट स्पॉट ठरले असल्यामुळे येथील नागरिक हे, यातून कसे वाचावे व जगावे या चिंतेत असताना माञ येथील खासगी डॉक्टरांनी माञ मोठा कहरच केला आहे.

हेही वाचा - जिंतूर शिवारात दुसऱ्यांदा आढळला 'स्वर्गीय नर्तक' पक्षी

गावात तीन खासगी दवाखाने आहेत. पण या महामारीत येथील डॉक्टरांनी आपली दवाखाने बंद ठेवली असल्यामुळे येथील नागरिकांना साधा ताप, खोकला, सर्दी व अंग दुखी झाली तरी त्यांना उपचारासाठी मुखेड, मुक्रमाबाद, उदगीर, बा-हाळी याठिकाणी जावे लागत आहे. तिथे गेल्यानंतर उपचार वेळेवर मिळत नाही. नागरिकांना गावातच असलेल्या दवाखान्यात वेळेवर उपचार मिळावे यासाठी दवाखाने उघडे ठेवण्याचे शासनाचे आदेश असातानाही येथील डॉक्टर हे, आपली दवाखाने पाच दिवसापासून बंद ठेवून येथील नागरिकांना मरणाच्या खाईत लोटत आहेत. या भस्मासुर कोरोनावर मात करण्यासाठी राज्यातील सर्वच यंत्रणा दिवस राञ आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत. तर राज्यातील सर्वच डॉक्टर हे, कोरोना रुग्णावर उपचार करून त्यांच्यासाठी देव ठरत आहेत. पण दापका ( गं) येथील डॉक्टर याला अपवाद असाल्याचे दिसून येत आहे. या महामारीत नागरिकांचा जीव वाचविणे तर दुरच त्यांच्यावर साधा प्राथमिक उपचारही येथील डॉक्टर करत नाहीत की, त्यांच्याकडे ढुंकूनही पाहात नसल्यामुळे येथील येथील डॉक्टर हे, नागरिकांसाठी दानवच ठरल्याचे असल्याचे बोलले जात आहे. २४ तास दवाखाने उघडी ठेवण्याचे आदेश असतानाही येथील डॉक्टरांनी गेल्या पाच दिवसापासून आपली दवाखाने बंद ठेवून शासनाला एक प्रकारे आव्हानच दिले आहे. पण अशा मुजोर डॉक्टरांच्या विरोधात शासन कोणती कारवाई करते याकडे आता गावक-यांचे लक्ष लागले आहे.

गावच्या सरपंचाच दवाखाना बंद

गावात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढत असून यामुळे अनेकांचा मृत्यू झाल्यामुळे गावात भितीचे वातावरण पसरले आहे. या परिस्थितीत गावचे सारपंच असलेल्या जयश्री झटकोडे,या गावक-यांना धीर देऊन या कोरोना संकटातून बाहेर निघण्यासाठी त्यांच्यापाठीशी खंबीरपणे राहाणे गरजेचे असाताना माञ त्याचे पतीच डॉ .बालाजी झटकोडे , हे, आपला दवाखाना बंद ठेवल्यामुळे गावक-यात संताप व्यक्त होत असून गावचे सरपंच जर आमच्यावर उपचार करत नसतील तर आम्ही कुठे जावे . असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.

दवाखाने बंद ठेवलेल्या डॉक्टरांवर कारवाई करण्यात येईल

२४ तास दवाखाने सुरु ठेवण्याचे शासनाचे आदेश असतानाही गेल्या पाच दिवसापासून दापका (गुं) येथील डॉक्टरांनी आली दवाखाने बंद ठेवने हे, चुकीचे आहे. या डॉक्टरांची असल्याची माहिती मागवत असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. आता नागरिकांना डॉक्टरांची खरी गरज असताना हे, दवाखाने बंद करत असतील तर अशा डॉक्टरांचे काही काम नाही. कारवाई तर होणारच.

- डॉ. रमेश गवाले, तालुका वैधकीय अधिकारी .मुखेड.

आमच्यावर उपचार कोण करणार...?

ताप, खोकला, सर्दी, डोके दुखीचे रुग्ण जास्त आहेत. ही, लक्षणे असली की, कोरोनाच झाला असे येथील नागरिकांना वाटत असल्यामुळे नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे. तपासणी व उपचार करण्यासाठी आम्हांला उदगीर, मुखेड, मुक्रमाबाद येथे जावे लागत आहे. पण येथील डॉक्टरांनी माञ आपली दवाखाने बंद ठेवून आमच्या जीवाशी खेळ मांडलेला आहे.

- जयपाल दापकेकर, नागरिक

संपादन- प्रल्हाद कांबळे