esakal | नांदेड : पत्नीच्या खूनानंतर विष पिलेल्या पतिचाही मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

शासकिय रुग्णालयात उपचार सुरु असतांना शुक्रवारी (ता. २५) रात्री मृत्यू झाला. ही घटना शहराच्या स्वामी विवेकानंदनगरमध्ये गुरुवारी (ता. २४) सकाळी उघडकीस आली होती.

नांदेड : पत्नीच्या खूनानंतर विष पिलेल्या पतिचाही मृत्यू

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा गळा चिरुन पतीने निर्घृण खून केल्यानंतर स्वत: उंदीर मारण्याचे विष प्राशन केलेल्या पतीचा शासकिय रुग्णालयात उपचार सुरु असतांना शुक्रवारी (ता. २५) रात्री मृत्यू झाला. ही घटना शहराच्या स्वामी विवेकानंदनगरमध्ये गुरुवारी (ता. २४) सकाळी उघडकीस आली होती. या प्रकरणी भाग्यनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यची नोंद करण्यात आली आहे. 
 
येथील सार्वजनीक बांधकाम विभागात वसंत पोटजाळे (वय ५७) चौकीदार पदावर कार्यरत होता. तो आपली पत्नी ज्योती (वय ३०) हिच्या चारित्र्यावर संशय घेत असे. यातून त्यांचे नेहमी वाद होत असत. ज्योती ही त्याची दुसरी पत्नी होती. त्याने पत्नी ज्योतीसोबत बुधवारी (ता. २३) रात्री भोजन करुन झोपले. त्याने शांत डोक्याने गुरुवारी पहाटेच्या सुमारास पत्नीचा गळा चिरुन खून केला. यानंतर त्याने उंदिर मारण्याचे विष प्राशन केले. सकाळी स्वत: हून भाग्यनगर पोलिस ठाण्यात हजर 
झाला. पत्नीचा खून करुन मी वीष प्राशन केले असे भाग्यनगर पोलिसांना सांगितले. यानंतर त्याला काही उपचारासाठी विष्णुपूरी येथील शासकिय रुग्णालयात दाखल केले होते. त्याच्यावर उपचार सुरु असतांना शुक्रवारी (ता. २५) रात्री मृत्यू झाला.

हेही वाचा -  नांदेड - अंत्यविधीसाठी शांतीधामला मिळाला आधार, फाउंडेशनचा मदतीचा हात; शंभर बेवारस - कोरोनाग्रस्त मृतांच्या अंत्यविधीसाठी जैव इंधन पुरवणार

मयत वसंत पोटजाळेवर होता खूनाचा गुन्हा 

खूनाच्या घटनेनंतर भाग्यनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अभिमन्यु सोळंके, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी भेट दिली होती. पोलिसांनी आरोपी वसंत पोटजाळे याला ताब्यातही घेतले होते. मात्र त्याने विष प्राशन केल्याने उपचारासाठी दाखल केले होते. वसंत पोटजाळे (वय ५७) याच्यावर भाग्यनगर पोलिसांनी पत्नीचा खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. 

महावितरण कंत्राटदाराच्या कामगाराचा मृत्यू 

तरोडा नाका परिसरातील जंगमवाडी भागात विज पुरवठा सुरळीत करण्यासाठी खांबावर चढलेल्या कंत्राटदाराचा कामगार विश्‍व नाथ शंकरराव रासे (वय ३५) हा चढला होता. मात्र त्याला जबर शॉक लागल्याने तो खाली कोसळून ठार झाला होता. ही घटना ता. २४ सप्टेंबर रोजी घडली होती. यानंतर नातेवाईकांनी आक्रोश करत महावितरणच्या कार्यालयात संबंधीतावर कारवाईची मागणी केली होती. या प्रकरणीही भाग्यनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. तपास पोलिस नाईक श्री. राठोड करत आहेत. 

loading image
go to top