नांदेड : जिल्ह्यात अवैध देशी, विदेशी दारु, हातभट्टी आणि शिंदी चालु देणार नाही- निलेश सांगडे

प्रल्हाद कांबळे
Monday, 5 October 2020

मात्र कोरोनाशी सामना करत येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यातील देशी, हातभट्टी आदी अवैध धंद्याविरुद्ध धरपकड मोहीम राबवून अनेकांना अटक केली.

नांदेड : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यासह संबंद राज्यात लॉकडाउनची परिस्थिती होती. आजही काहीअंशी लॉकडउनची परिस्थिती ता. ३१ आॅक्टोबरपर्यत आहे. मात्र कोरोनाशी सामना करत येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यातील देशी, हातभट्टी आदी अवैध धंद्याविरुद्ध माहे एप्रील 2020 ते आॅगस्ट 2020 या चार महिण्यात धरपकड मोहीम राबवून अनेकांना अटक केली. तर काही सराईत गुन्हेगारांचा हद्दपारीचा प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. 

जिल्ह्यात देशी, हातभट्टी व रसायनमिश्रीत शिंदी यासह परराज्यातील बनावट मद्य विक्रीला येत असते. या काळ्या कारनाम्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाकाची करडी नजर असते. अशा गोरखधंदा करणाऱ्यांवर कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन आणि उत्पादन शुल्कचे विभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक निलेश सांगडे यांनी आपल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना विश्‍वासात घेऊन जिल्हाभरात कारवाईचे सत्र सुरु  केले. जिल्ह्यात देशी व हातभट्टी अवैध मार्गे विकल्या जाणारी असल्याने नाकाबंदी करुन हजारो लिटर हातभट्टी, रसायनमिश्रीत शिंदी आणि परराज्यातील बनावट मद्य जप्त केलीआहे. जिल्ह्यातील किनवट, मुदखेड, माहूर, धर्माबाद, देगलुर, नांदेड, हिमायतनगर या तालुक्यामध्ये सर्वाधीक दारु संबंधाने गुन्‍हे घडतात. या भागातील सराईत गुन्हेगारांवर अनेकवेळा कारावई करण्यात आलेली आहे. 

हेही वाचा वाहनधारकांनो सावधान : पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या सुचनेवरुन वाहतूक शाखा जोमात

देशी मद्य (माहे एप्रील 2020 ते आॅगस्ट 2020)

देशी, विदेशी, बीअर आणि वाईन या मद्यांची विक्री गतवर्षीपेक्षा या वर्षी कमी झालेली आहे. कारण लॉकडाउनचा फटका बसला आहे. देशी मद्य सन २०२०- २१ मध्ये ४५ लाख ७१ हजार ९२१ लीटर विक्री झाली होती. मात्र सन २०१९ ते २० च्या दरम्यान ती ५८ लाख ४६ हजार ७५९ लीटर म्हणजेच १२ लाख ७४ हजार ८३८ लीटर मद्यांची कमी विक्री झाली. 

विदेशी मद्य 

सन २०२० ते २१ या काळात नऊ लाख १४ हजार ४९९ लीटर तर सन २०१९ ते २० च्या दरम्यान १२ लाख ४८ हजार ७२ लीटर विदेशी मद्याची विक्री झाली होती. यावर्षी जवळपास तीन लाख ३३ हजार ५७३ लीटर मद्य विक्री कमी झाली. 

बिअर 

सन २०२० त २१ मध्ये आठ लाख १९४ लीटर विक्री झाली असून सन २०१९ ते २० मध्ये त्यात घट होऊन १६ लाख ५५ हजार ४७७ लिटरची विक्री झाली. या मद्यातही घट होऊन शासनाला महसुलात वाढ करता आली नाही. यासोबतच वाईनमध्येही घट झाली आहे. सन २०१९ ते २० मध्ये १४ हजार ४५७ लीटर तर २०२० ते २१ मध्ये सात टक्के घट होत ती १३ हजार ४९८ लीटर विक्री झाली. 

येथे क्लिक करानांदेड हादरलं: शहरात 3 दुकानांवर गोळीबार, हल्ला करणारे ताब्यात

अवैध देशी, हातभट्टी व शिंदी विकणाऱ्यांवर कारवाई

जिल्ह्यात काही सराईत गुन्हेगार अवैध मार्गाने सतत दारु विक्री करत असतात. विशेष करुन चिकाळा तांडा (ता. मुदखेड) या परिसरात रात्री बेरात्री ही दारु वाहतुक सुरु असते. राज्य उत्पादन शुल्क विभागाने अनेकवेळा कारवाई करुन आरोपीना गजाआड केले होते. यापुढेही अशाच पध्दतीच्या कारवाया सुरु राहतील. अवैध दारु विक्री करणाऱ्यांनी सावध रहावे अन्यथा आपल्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल असा सज्जड दम दिला आहे. 

- निलेश सांगडे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, नांदेड
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Illegal domestic, foreign liquor, hand kilns and shindi will not be allowed in the district Nilesh Sangde nanded news