नांदेड : बेकायदेशीर गौण खनिजाची लुट, महसूल विभाग पैनगंगेच्या जीवावर तडजोड करण्यात मग्न

file photo
file photo

वाई बाजार ( जिल्हा नांदेड) : माहूर तहसील कार्यालयाचे कारभारी बारा महिने पैनगंगा नदीच्या जीवावर आपले चांग भले करण्यात मग्न राहत असल्याने दुसरीकडे संपूर्ण तालुक्यात गौण खनिजाची दिवसा खुलेआम लूट सुरू असल्याने तहसीलच्या महसूल विभागाच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात आहे.

माहूर तालुक्यातील पैनगंगा नदीवरील वाळू तस्करी हा विषय सर्वदूर परिचित झाला असून नित्याचीच बाब बनल्याने आता त्याला फारसं महत्त्व उरलेला नाही..जिल्हा प्रशासन वाळू घाटांचा लिलाव करत नाही. लोकांची मागणी वाढत जाते. आणि पर्यायाने तहसील कार्यालयाचे कारभारी वाळू माफियांना रात्रभर उपसा करून साठवणूक करा, दिवसा अवैध वाळू साठा जप्त करून पंचनामा केला जाईल आणि लगेच लीलाव करून रॉयल्टी दिली जाईल हे नाटक आता सर्वश्रुत झाले आहे..परंतु वाळू चोरीच्या पायंडाआड इतरही गौण खनिजाची दिवसा ढवळ्या खुलेआम लूट सुरू आहे. याकडे मात्र तहसील कार्यालयाचे कारभारी तीळ मात्र ही लक्ष घालायला तयार नाही. ‘काय तर म्हणे आमच्याकडे तेवढेच काम आहे का’ माहूरच्या तहसील कार्यालयात सर्वसामान्यांची कोणतीच कामे गुणाने होत नाहीये.

महसूल शाखेच्या पेशकाराच्या जाचाला कंटाळून सदगृहस्थ मंडळी तहसील कार्यालयात जाण्यासाठी धाजवत आहेत. अशात बेकायदेशीररित्या गौण खनिजाची लुट करणाऱ्यांची तक्रार करणार कोण आणि त्याची दखल घेणार कोण म्हणून की काय नागरिक आता थेट जिल्हाधिकार्‍यांना संपर्क करत आहेत. वाई बाजार येथे रॉयल्टी न घेता दिवसाढवळ्या मुरूम या गौण खनिजाचे बेकायदेशीर जेसीबी मशीनने उत्खनन करून वाहतूक केली जात आहे. घडत असलेल्या प्रकाराची सविस्तर माहिती सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी किर्ती किरण पूजार यांना दिली असता लवकरच पथक तयार करून कारवाई करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

संपादन - प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com