esakal | नांदेड : बारड येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कामांचा शुभारंभ
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

बाळासाहेब देशमुखांनी एक हाती सत्ता दिल्याबद्दल गावकऱ्यांचे मानले आभार

नांदेड : बारड येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कामांचा शुभारंभ

sakal_logo
By
गंगाधर डांगे

मुदखेड (जिल्हा नांदेड) : तालुक्यातील बारड येथे मंगळवार ( ता. २६ ) रोजी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विविध उपक्रमांचा शुभारंभ येथील ग्रामपंचायतचे पॅनलप्रमुख तथा शिवसेनेचे बाळासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळीश्री देशमुख बारडकर यांनी बारडवासियांनी एक हाती सत्ता दिल्याबद्दल ग्रामस्थांचे आभार मानले.

मंगळवार ( ता. २६ ) जानेवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालय बारड (ता. मुदखेड) येथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. इयत्ता १० वीमध्ये प्रथम आलेली श्वेता सुरेशराव देशमुख या विद्यार्थ्यांनीच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत विविध कामाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळेस जिल्हापरिषद हायस्कुल शाळेमध्ये डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम वाचनालयाचे उद्घाटन बाळासाहेब देशमुख बारडकर व राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त श्री. वाकडे यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा परिषद कन्या शाळा येथील विद्यार्थ्यांसाठी  जलशुद्धीकरण यंत्र ( R.O )ची व्यवस्था करण्यात आली. याचे देखील उद्घाटन बारड येथील जेष्ठ नागरिक पंडितराव देशमुख, मझर शेख, दौलत शेख यांच्या हस्ते करण्यात आले. 

जिल्हा परिषद कन्या शाळा येथील खोली बांधकामचे उद्घाटन नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच गावातील मुलांना क्रिकेट नेट प्रॅक्टिसकरिता क्रिकेट पीच तयार करण्यात आली. या वेळेस बारड ग्रामपंचायत पॅनलप्रमुख बाळासाहेब देशमुख बारडकर, विलासराव देशमुख, माणिकराव लोमटे, दिगंबर टिपरसे, कैलास फुलकुंठवार, किशन देशमुख, अवधूत सिरगिरे, प्रदीप देशमुख, प्रभाकर भीमेवार, मोहन सुर्यलाड, गजानन कत्रे, शरद कवळे, शिवाजी बुरुडे, वसंत लालमे, जेष्ठ नागरिक रघुनाथराव देशमुख, शिवाजीराव देशमुख, किशोर देशमुख, शामराव देशमुख, यशवंत पवार, बाबुराव लोमटे, बारडचे ग्रामविकास अधिकारी अनूप श्रीवास्तव, तलाठी अंजली बार्शीकर, बारडचे पोलिस पाटील यशवंतराव लोमटे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

संपादन- प्रल्हाद कांबळे