esakal | नांदेड : अनुसूचित क्षेत्रातील वैयक्तिक व सामुहिक वनहक्क दावेदारांनी अपिल दाखल करावे - डॉ. विपीन
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

अनुसूचित क्षेत्रातील जिल्हास्तरीय वनहक्क समितीने अमान्य केलेल्या वैयक्तिक वनहक्क व सामुहिक वनहक्क दावेदारांनी विभागीय वनहक्क समिती औरंगाबाद यांचेकडे अपिल दाखल करावे

नांदेड : अनुसूचित क्षेत्रातील वैयक्तिक व सामुहिक वनहक्क दावेदारांनी अपिल दाखल करावे - डॉ. विपीन

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : नांदेड जिल्ह्यात किनवट व माहूर तालुक्यातील एकूण 125 ग्रामपंचायतींमधील 238 गावांना अनुसूचित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. अनुसूचित क्षेत्रातील जिल्हास्तरीय वनहक्क समितीने अमान्य केलेल्या वैयक्तिक वनहक्क व सामुहिक वनहक्क दावेदारांनी विभागीय वनहक्क समिती औरंगाबाद यांचेकडे अपिल दाखल करावे असे, आवाहन जिल्हास्तरीय वनहक्क समिती नांदेडचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

हेही वाचा नांदेड : कृष्णूर धान्य घोटाळ्यातील तिघांना आज पुन्हा न्यायालयासमोर हजर करणार- सीआयडी -

निर्देशित अनुसूचित क्षेत्रातील जिल्हास्तरीय वनहक्क समितीने अमान्य केलेल्या अपिल दावेदारांना राज्यपाल महोदय यांची अधिसूचना 18 नोव्हेंबर 2020 व शासन निर्णय 10 डिसेंबर 2020 अन्वये जिल्हास्तरीय वनहक्क समितीने 18 मे 2020 पुर्वी अमान्य केलेल्या वनहक्क दाव्यावर 17 नोव्हेंबर 2020 पासून 6 महिन्याच्या आत तसेच 18 मे 2020 ते 17 नोव्हेंबर 2020 या कालावधीत अमान्य केलेल्या दावेदारांना 17 नोव्हेंबर 2020 पासून 90 दिवसांचे आत विभागीय वनहक्क समिती औरंगाबाद यांचेकडे अपिल दाखल करता येईल.

याशिवाय वरील कालावधीव्यतिरिक्त जिल्हास्तरीय समितीने अमान्य केलेल्या दाव्याच्या तारखेपासून 90 दिवसाचे आत विभागीय वनहक्क समितीकडे अपिल दाखल करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. 

loading image