नांदेड : महसुल विभागाची संयुक्त कारवाई; वाळू उपसा करणारी बोट नदीतच नष्ट, पाणी दुषीत व जलचर प्राण्याचे काय ?

नांदेड मुगट येथे गोदावरी नदी पात्रात अवैधरीत्या बाळु उपसा करणारे सक्शन मशीन ( बोट ) मागील कित्येक दिवसापासुन अवैध वाळू उपसा करत असल्याची चर्चा सुरु होती.
वाळू उपसा करणारी बोट
वाळू उपसा करणारी बोट

मुदखेड ( जिल्हा नांदेड ) : मुदखेड व नांदेड तालुक्याच्या (Nanded and mudkhed) गोदावरी पट्ट्यामध्ये वाळूमाफियांनी लाकडांचा गैरफायदा घेत सक्रिय होऊन रातोरात हजारो ब्रास वाळूचा (Godawari river in sand) उपसा करुन महसूल विभागाला ठेंगा दाखवला आहे. याची नुकतीच चाहूल नांदेडचे तहसीलदार किरण आंबेकर (tahshildar kiran ambekar) यांना लागताच त्यांनी मुदखेड महसूल विभागांची मदत घेत गुरुवारी ( ता.१३ ) रोजी सकाळी कारवाई करुन वाळू उपसा करणाऱ्या बोटला नदीपात्रामध्ये स्फोट घडवून उडून देण्यात आले आहे. (Nanded: Joint action of revenue department; Sand dredging boat destroyed in river, water polluted and aquatic animals?)

नांदेड मुगट येथे गोदावरी नदी पात्रात अवैधरीत्या बाळु उपसा करणारे सक्शन मशीन ( बोट ) मागील कित्येक दिवसापासुन अवैध वाळू उपसा करत असल्याची चर्चा सुरु होती. मात्र कारवाई करण्यात आली नव्हती. त्यामुळे माफियांचे धाडस वाढले होते.

हेही वाचा - कोरोना संकट : विवाह सोहळ्यांवर फिरले पाणी; अर्थव्यवस्थेलाही फटका

हा वाळू उपसा सुरु असल्याची माहिती ( ता. १३) मे रोजी सकाळी नांदेडचे तहसीलदार किरण आंबेकर, नायब तहसीलदार मुगाजी काकडे, मुदखेडचे नायब तहसीलदार संजय नागमवाड यांना मिळताच त्यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून सदर बोट स्फोटाद्वारे उडवून देवून नष्ट केली. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण व उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे, तहसीलदार किरण अंबेकर, नायब तहसीलदार मुगाजी काकडे व नायब तहसीलदार संजय नागमवाड यांच्या नेतृत्वाखाली हे परथक सकाळी १० वाजता पोहोचले.गोदावरीच्या पट्यात एक वाळू उपसा करत असलेली बोट परवानाधारक जिलेटीन वापर करणाऱ्या व्यक्तीस बोलावून घेऊन स्फोटद्वारे बोट आहे त्या ठिकाणीच नष्ट केली.

बोट उडवून न देता महसूल विभागाने जप्त कराव्यात- मागणी

मुदखेड तालुक्यातील गोदावरीच्या वाळू पट्ट्यामध्ये मागील अनेक दिवसापासून लाकडांचा फायदा घेत वाळूमाफियांनी हैदोस घातला आहे. याचेच उत्तम उदाहरण म्हणजे महसूल विभागाने केलेली कारवाई होय. महसुल विभागाने कारवाई करुन या बोटी, वाळू उपसा करिता वापरात येणारे साहीत्य जप्त करावे. नदीपात्रामध्ये स्फोट घडवून नष्ट न करता पात्राबाहेर काढुन जप्त करावे किंवा पाण्याचे बाहेर काढुन नष्ट करावे. जेणेकरुन पाण्यातील जलचर प्रान्यांची जिवीत हानी होनार नाही व सक्शन पंपातील आॅईल गळतीमुळे नदी पात्रातील पाणी दुषित होणार नाही अशी मागणी जिल्हाधिकारी विपीन ईटनकर यांच्याकडे करण्यात आली आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com