नांदेड : कंधार येथील शिवसैनिकांची एकनिष्ठता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded Kandahar Shiv Sainik loyalty Affidavit on bond paper

नांदेड : कंधार येथील शिवसैनिकांची एकनिष्ठता

कंधार : महाराष्ट्रात ४० शिवसेना आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर लोकसभेचे काही खासदारही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेत उभी फुट पडल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे निष्ठावंत शिवसैनिक तर दुसरीकडे शिंदे गटातील शिवसैनिक. शिवसेना कुणाची? यावरून वादंग निर्माण झाले आहे. राज्यात कोणाची शिवसेना खरी याबाबत चर्चा होत असताना कंधार येथील शिवसैनिकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे दाखवून देत १०० पदाधिकारी व शिवसैनिकांनी बॉण्ड पेपरवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निष्ठेचे शपथ पत्र नोटरी करून दिले आहेत.

नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघाचे शिवसेना आमदारांनी शिवसेने सोबत बंडखोरी केल्यानंतर हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील हे सुद्धा मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे.

जरी आमदार व खासदार शिंदे गटात गेले असले तरी सर्वसामान्य शिवसैनिकांसह नांदेड जिल्ह्यातील पदाधिकारी मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सोबत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. महाराष्ट्रासह नांदेड जिल्ह्यात सर्वसामान्य शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत असून कंधार तालुक्यातील शंभर पदाधिकारी व शिवसैनिकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आम्ही तुमच्या सोबत असल्याचे सांगत शंभर रुपयाच्या बॉण्ड पेपरवर निष्ठेचे शपथपत्र नोटरी करून दिले आहे.

बॉँड पेपर पाठवणाऱ्यामध्ये शिवसेनेचे नेते, उपजिल्हाप्रमुख, विधानसभा संघटक, तालुकाप्रमुख, तालुका संघटक, गटप्रमुख, गणप्रमुख, शाखाप्रमुख या पदाधिकाऱ्यांसह १०० शिवसैनिकांचा समावेश आहे. या निष्ठेच्या शपथपत्राचे संकलन शिवसेना नेते ॲड. मुक्तेश्वर धोंडगे व उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब कऱ्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाप्रमुख परमेश्वर जाधव, शहर प्रमुख धनराज लुंगारे, कंधारचे नगरसेवक गणेश कुंटेवार, पंचायत समिती सदस्य उत्तम चव्हाण, अतुल पापीनवार, दादाराव शिंदे, भगवान जाधव यांनी केले आहे.

Web Title: Nanded Kandahar Shiv Sainik Loyalty Affidavit On Bond Paper To Uddhav Thackeray

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top