

Nanded News
esakal
नांदेड: शहरातील उपेक्षित, निराधार आणि मानसिक आजारग्रस्त व्यक्तींना सन्मानाने जगण्याची नवी दिशा देणारा ‘कायापालट’ उपक्रम एप्रिल महिन्याच्या पहिल्या सोमवारी (७४ व्या महिन्यातही) तितक्याच सातत्याने आणि तळमळीने राबविण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत यावेळी ४७ भ्रमिष्ट व्यक्तींना स्वच्छता, आरोग्यसेवा आणि सन्मानाचे जीवन जगण्याचा प्रेरणादायी इतिहास घडविला.