
नांदेड : लाल किल्ला, मंत्रालय, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील, ग्रामपंचायतींसह देशभरातील विविध ठिकाणी स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन आणि महाराष्ट्रदिनी फडकणारा खादीचा तिरंगा ध्वज नांदेडमध्ये तयार होतो. भारतातील चार ठिकाणी खादीच्या राष्ट्रध्वजाची निर्मिती होते, त्यापैकी एक नांदेड आहे.