नांदेड : कुंटुर बरबडा कृषी उत्पन्न बाजार समिती असून अडचण नसून खोळंबा     

चंद्रकांत सूर्यतळ
Monday, 21 December 2020

केंद्र सरकारने कृषी उत्पन्न बाजार समिती बंद करण्यात येणार असल्याचा निर्णय घेतला आहे. तो योग्य होणार नाही. कारण व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होवून शेतकऱ्यांना तसेच व्यापाऱ्यांवर कोणाचेही नियंत्रण राहणार नाही. त्यामुळे व्यापारी मनमानी पद्धतीने भाव ठरवून शेतकऱ्याला लुटतील.

बरबडा ( जिल्हा नांदेड) : बरबडा व कुंटुर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन होऊन अनेक वर्षे झाली आहेत. मात्र सदर बाजार समितीला नफा झाला का तोटा याचे उत्तर अजुन कळले नाही. केंद्र सरकारने कृषी उत्पन्न बाजार समिती बंद करण्यात येणार असल्याचा निर्णय घेतला आहे. तो योग्य होणार नाही. कारण व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होवून शेतकऱ्यांना तसेच व्यापाऱ्यांवर कोणाचेही नियंत्रण राहणार नाही. त्यामुळे व्यापारी मनमानी पद्धतीने भाव ठरवून शेतकऱ्याला लुटतील.

कुंटुर कृषी उत्पन्न बाजार समितीला एकूण कुंटुर व बरबडा दोन सर्कलमधील ४२ गावे जोडली आहेत. सदर आडत दुकानात घोडा वजन काट्यांना बंदी आहे असे सांगितले. कुंटुर परिसरात इलेक्ट्रॉनिक वजन काटा न वापरता घोडी काट्यावर वजन केले जात आहे.

हेही वाचा -  नांदेड : भावी कारभारी गाव कारभारात झाले मश्गुल, हॉटेल, बार, चहाटपरी आणि पारावर रंगत आहेत चर्चा -

शेतकऱ्यांच्या सोयाबीनची पावती बिलहे कच्चे देण्यात येते एवढेच नाही तर दुकानदाराचे नाव नाही. शिक्का व मालाची किंमत नाही. त्यामुळे सर्व सामान्य शेतकऱ्यांचे गणितच बिघडले आहे. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीला किती कर भरले याचीही माहिती दिली जात नाही. त्यामुळे सर्व सामान्य शेतकऱ्याचा माल मोयचर व कटीच्या नावाने शेतकऱ्याला लुटले जात आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती कुंटुरला व बरबडा येथे असुन देखील शेतकऱ्याला त्याचा फायदा होत नाही. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती असून अडचण व नसून खोळंबा अशी गत झाली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचा फायदा फक्त व्यापारी व दुकानदार यानाच होत आहे. 

 

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Kuntur Barbada Agricultural Produce Market Committee is not a problem but a detention nanded news