आमचा किती अंत पाहणार !

मागील महिन्यात देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. स्वातंत्र्याने पंचाहत्तरी ओलांडली परंतू अजूनही चांगल्या रस्त्यावाचून, पुलाअभावी जीवनमान धोक्यात येते
आमचा किती अंत पाहणार !
आमचा किती अंत पाहणार !
Updated on

कुरुळा : मागील महिन्यात देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. स्वातंत्र्याने पंचाहत्तरी ओलांडली परंतू अजूनही चांगल्या रस्त्यावाचून, पुलाअभावी जीवनमान धोक्यात येते. शहरी आणि ग्रामीण असा हा भेदभाव मरणोत्तर संपणार का? मागील अनेक वर्षांपासून मागणी करूनही अद्याप हनमंतवाडी येथील नदीवर पुल झाला नाही. आधुनिक तंत्रज्ञान डोक्यावर घेऊन अजूनही पाण्यातूनच मार्ग काढावा लागत असल्याने आमचा किती अंत पाहणार? असा प्रश्न आता नागरिकांतुन उपस्थित होत आहे.

आमचा किती अंत पाहणार !
Osmanabad : मांजरा नदीकाठी १७ जण अडकले,एनडीआरएफ पथक दाखल


कुरुळा येथून सहा कीमी अंतरावर साधारणतः ६०० लोकवस्तीचे हनमंतवाडी हे छोटेशे गाव आहे. स्वातंत्र्यानंतर वाडीकरांची कायम उपेक्षा झाली मजबूत रस्ते नसल्याने अनेक पायाभूत सुविधांची वानवा. परंतु प्रयत्नांती दोन वर्षांपूर्वी सर्वप्रथम या रस्त्याने डांबर पाहिले. वाडीकरांनी मोकळा श्वास घेतला. रस्त्याअभावी सर्वांगीण विकासाला बसलेली खीळ उकलनार असे वाटले परंतु रस्ता अर्धवट झाला. होत असलेल्या रस्त्यावर वनविभागाने आक्षेप घेत काम थांबवले पुन्हा जैसे थे परिस्थिती.

आमचा किती अंत पाहणार !
राज्यात मुसळधार पाऊस, उस्मनाबादमध्ये NDRF पथक दाखल

शिक्षणासह आदी गरजा व दैनंदिन व्यवहारासाठी हनमंतवाडीकरांना कुरुळ्याकडे यावे लागते. परंतु गावालगत असणाऱ्या पाणवंत नदीवर स्वातंत्र्योत्तर पुलच बनवला नसल्याने गावकऱ्यांना पाण्यातूनच वाट शोधावी लागत आहे. पावसाळ्यात शेतीकामासाठी अथवा बाहेरगावी नदीपालिकडे गेलेली व्यक्ती गावात येईपर्यंत जीवात जीव नसतो रोजच मृत्यूला आमंत्रण देणारी परिस्थिती ओलांडून गावकऱ्यांना जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागते. याकडे मात्र लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याचे बोलले जात आहे.

नुकतेच (ता.२५) रोजी गावातील तरुणाला नदीपात्रातून जाताना आपले प्राण गमवावे लागले. या घडलेल्या घटनेवरून लोकप्रतिनिधींनी जागे होऊन पुल तयार करून द्यावा आणि स्वातंत्र्यानंतरचे स्वातंत्र्य बहाल करावे अशी हनमंतवाडी येथील नागरिकांची मागणी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com