हिमायतनगरात गुटख्यासह 41 लाखांचा मुद्देमाल जप्त; स्थानिक गुन्हे शाखा विभागाची धाडसी कार्यवाही

gutkha taskari.
gutkha taskari.
Updated on

हिमायतनगर (नांदेड): शहरातील सिरंजनी रस्त्यावरील एका गोडाऊनमध्ये शासनाने बंदी घातलेला लाखो रुपयांचा गुटखा ट्रकमधून उतरण्याच्या तयारीत असताना नांदेड येथील गुन्हा अन्वेषण विभागांच्या पथकाने धाड टाकून जप्त केला. तालूक्यात गेल्या अनेक वर्षांपासून गुटख्याची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. सदर कारवाई सोमवार ता. 15 सायंकाळी चार वाजताच्या दरम्यान करण्यात आली.

हिमायतनगर शहरात गेल्या अनेक वर्षांपासून होलसेल दराने गुटख्याची विक्री होत असून शहरातून अजबाजूच्या जिल्ह्यात राजरोस पणे होलसेल दराने गुटख्याची विक्री होत होती. असेच एका गुप्त खबऱ्यामार्फत हिमायतनगर मध्ये मोठ्या प्रमाणावर गुटखा येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. पोलिस पथकाद्वारे सिरंजनी रस्त्यावरील एका गोडाऊन मध्ये ट्रक क्रमांक (एमएच. 26 एच 7091) मधून सव्वीस लाख 42 हजार रुपयाचा शासनाने बंदी घातलेला राजनिवास गुटखा जप्त केला असून ट्रकसह 41 लाख 42 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गुटखा तस्कराने ट्रकमध्ये गुटखा नसल्याचा संशय येऊ नये म्हणून ट्रकच्या मागच्या भागात कापसाच्या गाठी भरल्या होत्या. तरी मात्र गुप्त खबऱ्याच्या माहितीवरून गुन्हे अन्वेषण विभागाने धाडसी कार्यवाही करून लाखो रुपयाचा गुरखा जप्त केला. यामुळे गुटखा तस्करात खळबळ उडाली आहे.

सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे, व गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.काॅ. संजय केंद्रे, पो. हे. काॅ. शेख चांद शेख. अल्ली, पो. ना. गंगाधर कदम, चालक अर्जुन शिंदे यांनी ही कारवाई केली. गुटख्यासह ट्रक जप्त केला असून अज्ञात आरोपीविरुद्ध हिमायतनगर पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती. एवढी मोठी कारवाई करून सुद्धा आरोपीताना पोलिसांनी अटक करण्यात यश आले नाही. आरोपींना अटक करण्याचे पोलिसांसमोर एक मोठे आव्हान आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com