नांदेड : २२ गुंठ्यात लिंबू पिकाचे दोन लक्ष रुपयाचे उत्पन्न

बंडू माटाळकर
Wednesday, 21 October 2020

तळणी येथील नारायण मगर हे शेतकरी दरवर्षी आपल्या शेतीत ते नवनविन प्रयोग करुन वेगवेगळे पिक घेतात

निवघाबाजार ( जिल्हा नांदेड ) : सेंद्रीय शेतीचा प्रयोग करुन खडकाळ जमीनीवर अवघ्या 22 गुंठे रानात लिंबू पिकाची शेती करुन तळणी (ता. हदगाव) येथील नारायणराव मगर हे शेतकरी वर्षाला काढतात दोन लक्ष रुपयाचे उत्पन्न.
तळणी येथील नारायण मगर हे शेतकरी दरवर्षी आपल्या शेतीत ते नवनविन प्रयोग करुन वेगवेगळे पिक घेतात. कोणता प्रयोग फसतो तर कोणत्या प्रयोगात फायदा होतो. जरी एखाद्या प्रयोगात फसलो, तर अनुभव पाठीशी राहतो, असे नारायण मगर यांनी सांगीतले .

त्यांनी सहा वर्षा पूर्वी खडकाळ जमिनीत २२ गुंठे क्षेत्रात १५ × २० अंतरावर लिंबोनीचे ९० रोपे लावली, नागपुर येथून कागदी लींबूची रोपे आणली होती. लीबू रोपे मोठे होई पर्यंत दोन वर्ष याच लींबोनी मधे अंतर पिक घेतले तर लिंबोनी पिकाला रासायणीक खत, ओषधी चा वापर केला नाही.गोमूत्र. शेणखत ; निंबोळी अर्क चा वापर केला लिंबोनी लागवण केली तेंव्हा पासून चार वर्षाला फळधारणा झाली किमान एका झाडाला एक हजार फळे लागली एक झाड एक हजार रुपायाला विक्री झाले म्हणजे ९० झाडाचे ९० हजार रुपये आले तर वर्षात लिंबोनीला दोन वेळा बहार येतो. या मुळे वर्षी काठी झिरो बजेट शेती असल्याने, आणि केवळ बावीस गुंठे क्षेत्रफळ आसल्याने नारायण मगर आणि त्यांची पत्नीच बागेची फळ तोडणे, पाणी देणे, फवारणी अदी सर्व कामे स्वतः च करीत असल्याने मजुरी लागत नाही. या मुळे निव्वळ नफा एक लाख 80 हजार रुपये झाल्याचे त्यांनी सांगीतले.

हेही वाचा - नांदेड : वीजचोरून वापरणाऱ्या 24 आकोडेबहाद्दरांवर महावितरणची कारवाई -

शेतीमध्ये नवनविन प्रयोग करून वेगवेगळी पिके घेतली 

सेंद्रीय पध्दतीने लींबू पिक असल्याने गावातील व परीसरातील व्यापारी शेतात येऊन लिंबू घेऊन जातात. या मुळे वाहतुकीचा खर्च लागत नाही. यावर्षी एका एकर शेता मध्ये शेवगा ची लागवड केली असून अंतर पिक म्हणून 55 लिंबू ची रोपे लावली असल्याचे त्यांनी सांगीतले. तर त्यांची दोन मुलं शासकीय नौकरीला आसल्याचे त्यांनी सांगीतले. शेतीमध्ये नवनविन प्रयोग करून वेगवेगळी पिके घेतली तर शेतकरी प्रगतशील बनू शकतो म्हणून नापिकीमुळे महाराष्ट्रात होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या पण थांबतील असा संदेश त्यांनी दिला.

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Lemon crop yields Rs 2 lakh in 22 guntas nanded news