नांदेड - पन्नासपेक्षाही कमी पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद, सोमवारी १७२ करोनामुक्त, दोघांचा मृत्यू 

शिवचरण वावळे
Monday, 26 October 2020

सोमवारी (ता.२६) ६३५ अहवाल प्राप्त झाले. यामधील ५३६ निगेटिव्ह, ४३ स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. आताजपर्यंत जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १८ हजार ७९६ इतकी झाली आहे.

नांदेड - ऑक्टोबरच्या सुरवातीपासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत सतत घट होत आहे. हे जिल्ह्याच्या दृष्टीने दिलासादायक आहे. सोमवारी (ता. २६) प्राप्त झालेल्या अहवालात १७२ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर दोन बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आणि पन्नासपेक्षा कमी पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. 

रविवारी (ता. २५) तपासणीसाठी घेण्यात आलेल्या स्वॅबपैकी सोमवारी (ता.२६) ६३५ अहवाल प्राप्त झाले. यामधील ५३६ निगेटिव्ह, ४३ स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. आताजपर्यंत जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १८ हजार ७९६ इतकी झाली आहे. विष्णुपुरीच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयातील हदगाव येथील महिला (वय-६५) व देगलूर तालुक्यातील हिप्परगा येथील तरुण (वय-२०) या दोन कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उपचार सुरु असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची मृत्यूसंख्या ५०२ इतकी आहे. 

हेही वाचा- कोरोना व ओला दुष्काळाचा सामना करण्याची शक्ती दे, श्री रेणुका मातेला साकडे

१७२ पॉझिटिव्ह रुग्ण कोरोनामुक्त 

सोमवारी विष्णुपुरीच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय- चार, श्रीगुरु गोविंदसिंघजी स्मारक जिल्हा शासकीय रुग्णालय- सात, एनआरआय, पंजाब भवन, महसूल भवन आणि होम क्वॉरंटाईनमदील ७६, देगलूर- तीन, अर्धापूर - पाच, कंधार- तीन, लोहा- दोन, मांडवी - सहा, मुखेड- तीन, उमरी- पाच, भोकर- सहा, धर्माबाद- दोन, किनवट- पाच, माहूर- सहा, मुदखेड- चार, नायगाव - १२ आणि खासगी रुग्णालय- २३ असे १७२ पॉझिटिव्ह रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातुन सुटी देण्यात आली. आतापर्यंत १७ हजार ३९९ रुग्णांनी कोरोनावर यशस्विरित्या मात केली. 

हेही वाचले पाहिजे- नांदेडातील मटका हायटेक, मोबाईलवरुन आकड्यांची शाळा, कमल यादववर गुन्हा ​

७७४ कोरोना बाधितावर उपचार सुरु 

रविवारी घेण्यात आलेल्या आरसीपीसीआर आणि अँन्टीजन टेस्ट किटद्वारे घेण्यात आलेल्या स्वॅब चाचणीत सोमवारी नांदेड वाघाळा महापालिका क्षेत्रात - ३१, नांदेड ग्रामीण- तीन, भोकर- दोन, देगलूर- एक, नायगाव- एक, किनवट- दोन, बिलोली- दोन आणि पुणे एक असे ४३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आतापर्यंत १८ हजार ७९६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यापैकी १७ हजार ३९१ कोरोना बाधितांनी असाध्य अशा रोगावर विजय मिळविला आहे. सध्या ७७४ कोरोना बाधितावर उपचार सुरु आहेत. यामधील ३७ रुग्णांची प्रकृती गंभीर असून सोमवारी रात्री उशिरापर्यंत ३९० जणांचे अहवाल तपासणी सुरु होती. 

नांदेड जिल्हा -

आज पॉझिटिव्ह- ४३ 
आज कोरोनामुक्त- १७२ 
आज मृत्यू- दोन 
एकुण पॉझिटिव्ह- १८ हजार ७९६ 
एकुण कोरोनामुक्त- १७ हजार ३९१ 
एकुण कोरोनाने मृत्यू- ५०२ 
सध्या उपचार सुरु- ७७४ 
गंभीर रुग्ण- ३७ 
स्वॅब अहवाल येणे बाकी- ३९० 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded - Less than fifty positive patients registered 172 crore free on Monday, 2 deaths Nanded News