नांदेड : ग्रंथालयांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन वाचकांना सेवा पुरवावी- सुनील हुसे

प्रल्हाद कांबळे
Sunday, 22 November 2020

याप्रसंगी जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक, वाचक बसवराज कडगे काका, राजेंद्र हंबीरे, अनील बावीस्कर, प्रताप सुर्यवंशी यांची उपस्थिती होती. सर कार्याक्रमात श्री हुसे यांचे हस्ते जेष्ठ वाचक कडगे काका यांना प्रातिनिधीक सभासद कार्ड व पहिल्या ग्रंथाचे ई-ग्रंथालय आज्ञावली मार्फत वाटप करण्यात आले.

नांदेड:- सार्वजनिक ग्रंथालयांनी आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान आत्मसात करुन  वाचकांना ग्रंथालयीन सेवा पुरवणे काळाची गरज आहे. आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात सार्वजनिक ग्रंथालयांनी काळाची गरज म्हणून  फेसबुक, ट्विटर, व्हॉट्स अॅप, ई-ग्रंथालय आज्ञावली व इतर मार्गांनी वाचकापर्यंत पोहचून जास्तीत जास्त वाचक जोडावेत जेणेकरुन आपल्या ग्रंथालयातील उपलब्ध साहित्याचा वाचकांना लाभ होईल, असे प्रतिपादन औरंगाबाद विभागाचे सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे यांनी केले. ते जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय नांदेड येथे ई-ग्रंथालय आज्ञावलीद्वारे वाचकांना देण्यात येणाऱ्या ग्रंथ देव-घेव, OPAC व इतर ग्रंथालयीन सेवांच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

हेही वाचा -  नांदेड : अर्ज मागे घेण्यासाठी खंडणी स्विकारतांना एकाला रंगेहात पकडले -

याप्रसंगी जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक, वाचक बसवराज कडगे, राजेंद्र हंबीरे, अनील बावीस्कर, प्रताप सुर्यवंशी यांची उपस्थिती होती. सर कार्याक्रमात श्री हुसे यांचे हस्ते जेष्ठ वाचक कडगे काका यांना प्रातिनिधीक सभासद कार्ड व पहिल्या ग्रंथाचे ई-ग्रंथालय आज्ञावली मार्फत वाटप करण्यात आले.

जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी  प्रास्ताविकात कार्यालयात ई-ग्रंथालय आज्ञावली बाबत तसेच  कार्यालयात झालेल्या एकुण कामाबाबत व भविष्यात याद्वारे देण्यात येणाऱ्या सेवांबाबत उपस्थितीतांना माहिती दिली. याप्रसंगी जिल्हा ग्रंथालय संघाचे सचिव राजेंद्र हंबीरे व कडगे काका यांनी सुध्दा याप्रसंगी मार्गदर्शन केले. या कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्र. के. सुर्यवंशी, के. एम. गाडेवाड, संजय पाटील, गजानन कळके आदींनी प्रयत्न केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Libraries should provide services to readers using modern technology Sunil Husse nanded news