नांदेड : उन्हाळा तापत असल्यामुळे, पशुधन विक्रीसाठी बाजारात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded Livestock market for sale scarcity of feed and water

नांदेड : उन्हाळा तापत असल्यामुळे, पशुधन विक्रीसाठी बाजारात

नांदेड : कडक उन्हाळा तापत असल्यामुळे जिल्ह्यात पिण्याचा पाण्याचा तसेच जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दिवसेंदिवस परिसरात चाराटंचाई भेडसावू लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले पशुधन विक्रीला काढले आहे. चाराटंचाईमुळे गुराढोरांना पोटभर चारा मिळत नसल्याने मुक्या जनावरांना कसायाच्या दावणीला बांधावे लागत असल्याचे वास्तव बघायला मिळत आहे. कालपर्यंत ज्यांच्या भरोशावर शेती सांभाळली व ज्यांच्यामुळे त्यांना सुखाचे दिवस पाहायला मिळाले, दिवसरात्र ज्यांच्या खांद्यावर धुरा ठेऊन रोजीरोटी कमविली, त्याच गुराढोरांना पोटभर चारा मिळत नसल्याने त्यांचे पालनपोषण कसे करावे? ही समस्या शेतकऱ्यांसमोर निर्माण झाली आहे. गुरांचा चारा व खुराकीचा खर्च झेपत नसल्यामुळे नाइलाजास्तव पशुधन विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

भारनियमाचे नियोजन नाही

यावर्षी उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच कडवा-कुटार व गवताची टंचाई भासू लागली आहे. सोयाबिनचे पीक वाया गेल्याने सोयाबिनचे कुटार नाही. थोडेबहुत तुरीचे कुटार होते ते संपण्याच्या मार्गावर आहे. ज्यांच्याकडे पाण्याची सोय आहे, अशांनी थोडाफार मका, कडारु पेरला. पण बारनियमनामुळे पाण्याअभावी जास्त प्रमाणात पेरता आला नाही. कोरडवाहू शेतकऱ्यांकडे मात्र पर्याय नाही. त्यांच्याकडे असलेला कडबा कुटार संपण्याच्या मार्गावर आहे. बैलांकरिता शिवारात हिरवा चारा नाही. गुरांचा चारा व खुराकीचा खर्च वाढत चालला असल्यामुळे फुकटच दावणीला बांधून त्याच्या चाऱ्याकरिता खर्च करणे शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यामुळे बैलबाजारात बैलजोड्यांसह दुधाळ जनावरे गाई, म्हशीही मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी येत आहे.

प्रशासनाने बाजारात पाण्याची सोय करावी

मालटेकडी परिसरातील फळबाजाराला लागून जनावरांचा बाजार भरतो. चारा टंचाई, पाणी टंचाईसोबतच दुधाला भाव मिळत नसल्याने जनावरे या बाजारात विक्रीसाठी येतात. मात्र, या बाजारात कुठल्याही प्रकारच्या सोयी-सुविधा मिळत नसल्याने दिवसभर जनावरांसह मालकांना उन्हातच राहावे लागते. जनावरांसाठी पाण्याचीही सोय नाही. त्यामुळे प्रशासनाने या बाजारात पाण्याचा हौद बांधून जनावरांची तहान भागवावी, अशी मागणी कामठा येथील जयराज बाबाराव जाधव, सुमित औराळकर, दिगांबर भरकडे (नांदगाव), दत्तराम कदम (चिंचोली), शेख युनुस टांगेवाले, शिवाजी भरकडे, प्रभू विरकर (अर्धापूर) यांनी केली आहे.

जनावरांचे पालनपोषण कसे करणार

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या बैलजोड्या तसेच गुरेढोरे सधअया विक्रीसाठी नांदेडचया बैलबाजारात पाहावयास मिळत आहे. शेतकरी बैलजोडी सोबतच दुग्धव्यवसायाकरिता गायी, म्हशी, बकऱ्या सुद्धा पाळतात. उन्हाळ्याच्या दिवसात चारा नसल्याने एवढ्ा जनावरांचे पालनपोषण करणे शेतकऱ्याला अवघड होत आहे.

Web Title: Nanded Livestock Market For Sale Scarcity Of Feed And Water

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top