Nanded News : तरूणांनी दिला जलसमाधीचा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded Loha Nandgaon Chincholi Bad road condition

Nanded News : तरूणांनी दिला जलसमाधीचा इशारा

मारतळा : नांदगाव - चिंचोली (ता. लोहा) या दोन गावांना जोडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे या मार्गावर जागोजागी खड्डे पडल्याने वाहन तर सोडाच पायी चालणे हे मुश्किल झाले आहे. या खराब रस्त्यामुळे एका व्यक्तीला आठ दिवसांपुर्वीच उपचारास नेत असताना वाटेतच मृत्यूने गाठले. या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी मागणी करूनही लोकप्रतिनिधीसह, जिल्हा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अखेर उपरोक्त दोन गावाच्या तेरा तरुणांनी (ता.३०) ऑगष्ट रोजी गोदावरी नदीपात्रात उतरून सामुहिक जलसमाधी घेऊन जीवन संपवण्याचा इशारा लेखी निवेदनाद्वारे जिल्हा व तालुका प्रशासनास दिला आहे.

नांदेड- हैदराबाद महामार्गाला व मारतळा बाजारपेठेशी जोडणाऱ्या नांदगाव - चिंचोली या दोन गावाला जोडणारा चार किलोमीटरचा रस्त्याची दुरवस्था झाली असून, जागोजागी खड्डे पडले असल्याने या मार्गावरून वाहने तर सोडाच, पण पायी चालतानाही कसरत करावी लागत आहे. तर गंभीर रुग्णास उपचारासाठी वेळेत पोहोचणेही शक्य होत नाही, त्यामुळे मागील आठवड्यातच सुभाष भरकडे (वय ५५) यांच्या छातीत दुखत असल्यामुळे त्यांना उपचारासाठी नेत असताना खड्ड्यामुळे त्यांचा रस्त्याच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी नांदगाव व चिंचोली या दोन गावच्या संतप्त तेरा तरूणांनी शिवारात असलेल्या गोदावरी नदीवरील आमदुरा उच्च पातळी बंधाऱ्यात (ता.३०) ऑगस्ट रोजी मंगळवारी सामुदायिक जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे. यावर धनाजी जाधव, दत्तप्रसाद जाधव, नागेश जाधव, व्यंकटी जाधव, नवनाथ जाधव, मुकिंदा जाधव, संतोष जाधव, (सर्व रा. चिंचोली) कृष्णा भरकडे, अवधूत भरकडे, महारुद्र भरकडे, माधव भरकडे, संतोष भरकडे, हरी भरकडे, (रा.सर्व नांदगाव) या तेरा तरुणांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Nanded Loha Nandgaon Chincholi Bad Road Condition Construction Department

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..