Nanded Development News : विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करणार : कल्याणकर

विनाअट संयुक्त महाराष्ट्रात सामील झालेल्या मराठवाड्यावर हा एक प्रकारचा अन्याय आहे. ता. १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती दिनाचा अमृत महोत्सव साजरा केला जाणार आहे.
Nanded Development News : विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करणार : कल्याणकर

मंत्रीमंडळाची बैठक घेतली नाही तर आंदोलन

डॉ. व्यंकटेश काब्दे; मराठवाडा जनता विकास परिषदेचे अधिवेशन

Nanded News : मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी काळात मराठवाड्याच्या विकास प्रश्नांवर राज्य मंत्रीमंडळाची बैठक औरंगाबादला झाली नाही तर आम्हाला तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा मराठवाडा जनता विकास परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे यांनी दिला आहे.

मराठवाडा जनता विकास परिषदेचे शहर शाखेचे अधिवेशन नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या स्वामी रामानंद तीर्थ संशोधन सभागृहात दिवंगत उत्तमराव सुर्यवंशी विचारपीठ येथे रविवारी (ता. १६) पार पडले.

यावेळी अध्यक्षस्थानावरून डॉ. काब्दे बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार बालाजी कल्याणकर, प्रा. राजाराम वट्टमवार, उद्योजक हर्षद शहा, शहराध्यक्ष ॲड. प्रदीप नागापूरकर आदी उपस्थित होते. डॉ. काब्दे म्हणाले की, गेल्या काही वर्षापासून राज्य मंत्रीमंडळाची बैठक औरंगाबादला घेण्याची प्रथा मोडीत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.

विनाअट संयुक्त महाराष्ट्रात सामील झालेल्या मराठवाड्यावर हा एक प्रकारचा अन्याय आहे. ता. १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती दिनाचा अमृत महोत्सव साजरा केला जाणार आहे. त्याचे औचित्य साधून शासनाने राज्य मंत्रीमंडळाची बैठक घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

केंद्रीय मंत्रिमंडळाने मराठवाडा वैधानिक विकास मंडळाला मुदतवाढ देण्याचा राज्य शासनाचा प्रस्ताव तातडीने मंजूर करुन वैधानिक विकास मंडळे कार्यान्वीत करावे, अशी मागणी केली. विकासाच्या चळवळीत तरुणांचा सहभाग आवश्यक आहे.

तरुणांनी विकासाचा गांभिर्यपूर्वक अभ्यास करुन हे प्रश्न शासन दरबारी मांडले पाहिजे. शासनाने या प्रश्नांची सोडवणूक केली नाही तर सनदशीर मार्गाने आंदोलन करावे लागेल, असा इशारा डॉ. काब्दे यांनी दिला.

Nanded Development News : विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करणार : कल्याणकर
OpenAI Bug Bounty Program : शोधा ChatGPT मधील चुका आणि मिळवा 16 लाखांपर्यंतचं बक्षीस

उद्योजक शहा यांनी जिल्ह्याच्या औद्योगिक विकासावर मत व्यक्त केले. यावेळी ‘नांदेड महानगर विकासाची वाटचाल’ या विषयावर उपप्राचार्य प्रा. डॉ. सिद्धेवाड यांचे तर ‘मराठवाड्यातील विकास विषयक चळवळी’ या विषयावर प्रा. डॉ. प्रभाकर जाधव यांचे व्याख्यान झाले. प्रास्ताविक शहराध्यक्ष ॲड. नागापूरकर यांनी केले. सुत्रसंचलन शहर सचिव प्रा. डॉ. लक्ष्मण शिंदे व प्रा.विकास सुकाळे केले तर के. के. जांबकर यांनी आभार मानले.

यावेळी प्राचार्य गोपाळराव कदम, प्राचार्य रावसाहेब जाधव, खंडगावकर, प्रा. बालाजी कोम्पलवार, ॲड. धोंडीबा पवार, ललिता कुंभार, एम. आर. जाधव, डॉ. आदिनाथ इंगोले, दिलीप मोकले आदी उपस्थित होते. अधिवेशनात १४ ठराव एकमुखाने पारित करण्यात आले.

Nanded Development News : विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करणार : कल्याणकर
MUHS Summer Internship Program: आरोग्‍य विज्ञान विद्यापीठातर्फे समर एंन्‍ट्रन्‍सशिपचा प्रोग्रॅम; ही आहे मुदत

विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करणार : कल्याणकर

जिल्ह्यातील प्रलंबित विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी दिली. परिषदेने विकास प्रश्नांचा प्रस्ताव दिल्यास शासनाकडे पाठपुरावा केला जाईल.

नांदेड शहरातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी उड्डाणपुलासह, आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय स्थापन झाले आहे. नांदेडला कृषी महाविद्यालय लवकरच कार्यान्वित केले जाणार असून विकासासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com