

Nanded News Rohan Waghmare Rides Royal Enfield to Umling La in Ladakh Fulfilling His Childhood Dream With Family Support
esakal
नवीन नांदेड : स्वप्न पाहणारे अनेक असतात; मात्र ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी हजारो किलोमीटरचा प्रवास करण्याचे धाडस फार थोडे जण दाखवतात. नांदेडचे सुपुत्र आणि एसजीजीएस महाविद्यालयाचे माजी संचालक डॉ. एल. एम. वाघमारे यांचे चिरंजीव रोहन वाघमारे यांनी असेच एक साहसी स्वप्न साकार केले. कामानिमित्त सिंगापूरमध्ये वास्तव्यास असलेल्या रोहन यांनी केवळ हिमालयातील बाईक रायडिंगचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भारतात येत लेह-लडाखच्या दुर्गम पर्वतरांगांमध्ये रॉयल एनफिल्डवर तब्बल एक हजार किलोमीटरहून अधिक अंतराची मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली.