नांदेड : तीन महिन्यांपूर्वी केलेला रस्ता उखडला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded Mandvi to Sarkhani road construction Asphalting damage

नांदेड : तीन महिन्यांपूर्वी केलेला रस्ता उखडला

मांडवी : मांडवी ते सारखणी या मार्गावरील तीन महिन्यांपूर्वी केलेले डांबरीकरण उखडले असून बांबूच्या पुलावरील स्लॅब दबल्यामुळे गतिरोधके निर्माण झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाच्या दर्जा बाबत सांश्यकता निर्माण झाली आहे.

परिसरातील रस्त्याचे खडे बुजवीने व डांबरीकरणाचे काम उन्हाळ्यात करण्यात आले आहेत. कामाचा दर्जा बरोबर नसल्यामुळे तीन महिन्यांपूर्वी मजबुतीकरण करण्यात आलेल्या दरसांगावी ते टिटवी जंगलातील रस्त्यावर मोठाले खडे पडले आहेत. रस्त्याच्या बाजूला मुरूम टाकून भरम साईड भरणे आवश्यक असताना अनेक ठिकाणी रस्त्याकाठच्या नालीतील काळी माती टाकण्यात आली आहे, त्यामुळे एकमेकांना बाजू देत असताना वाहने फसण्याचे प्रकार वाढले आहे.

याच रस्त्यावर गत वर्षी मोटारसायकल वर मागे बसलेली महिला पडली व तिच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला होता. रस्त्यावरील सिमेंट बांबूची अनेक पुल कालबाह्य झाल्यामुळे नवीन बांबू टाकून बांधकाम करण्यात आले व त्यावर काँक्रेट टाकण्यात आला आहे. परंतु माती मिश्रित वाळू व सिमेंटचे कमी प्रमाण वापरल्यामुळे बांबूच्या फटीतील काँक्रेट दबला गेल्यामुळे पुलावर गतिरोधक निर्माण झाले आहे. त्यामुळे सुसाट येणारी अनेक वाहने आदळून प्रवासी जखमी होण्याचे प्रकार घडत आहेत.

Web Title: Nanded Mandvi To Sarkhani Road Construction Asphalting Damage

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..