नांदेड बाजार समितीला अंधश्रद्धेची 'भानामती'; अमावस्या असल्याने बीट ठेवले बंद

बाजार समितीवरील अंधश्रद्धेचा पगडा उतरण्यासाठी आता कोणता वैदू पुढे येणार हा खरा प्रश्न आहे. पुरोगामी महाराष्ट्रात अंधश्रद्धेला बळी पडलेल्या अनेक घटना सातत्याने घडत असतात.
नांदेड कृषी उत्पन्न बाजार समिती
नांदेड कृषी उत्पन्न बाजार समिती

नांदेड : पुरोगामी महाराष्ट्राची लाज वेशीवर टांगत शाहू- फुले- आंबेडकरांचे नाव घ्यायचे आणि पुरोगामी महाराष्ट्राचा टेंभा मिरवायचा. तर दुसरीकडे त्याच महाराष्ट्रातील लाज जगाच्या वेशीवर टांगायची हा प्रकार तसा नवा राहिला नाही. नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीने नेमके तेच केले. अमावास्या असल्याने गुरुवारी (ता. दहा) नवा मोंढा येथील ऐन पेरणीत शेतीमालाचे बीट बंद ठेवून अंधश्रद्धेची भानामती असल्याचे दाखवून दिले. अचानक बीट बंद ठेवल्याने अनेक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

बाजार समितीवरील अंधश्रद्धेचा पगडा उतरण्यासाठी आता कोणता वैदू पुढे येणार हा खरा प्रश्न आहे. पुरोगामी महाराष्ट्रात अंधश्रद्धेला बळी पडलेल्या अनेक घटना सातत्याने घडत असतात. त्यात आता नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीची नव्याने भर पडली आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत अंधश्रद्धेविरुद्ध लढा लढला. लोकांमध्ये जनजागृती केली. परंतु त्यांचा विचार नांदेड बाजार समितीपर्यंत अद्यापही पोहोचला नसल्याचे गुरुवारी दिसून आले.

हेही वाचा - महिलांनी आपल्या कामांबद्दल सदैव आत्मसन्मान बाळगणे गरजेचे- डॉ. विपीन इटनकर

गुरुवार (ता. 10) जून रोजी अमावस्या असल्याने बाजार समितीने शेतीमालाचे नवामोंढातील बीट बंद ठेवण्याचा जणू पराक्रम गाजविला आहे. बुधवार ता. नऊ जून रोजी दुपारी एक वाजून 57 मिनिटाला अमावस्या प्रारंभ झाली. ती गुरुवार 10 जून रोजी सायंकाळी चार वाजून २१ मिनीटाला समाप्त होणार आहे. त्यामुळे अमावस्या असल्याने बीट सुरु ठेवण्यास अपशकुनी ठरते या विचाराने नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतीमालाचे बीट बंद ठेवून आमावस्येचा पगडा असल्याचे दाखवून दिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com