नांदेड : जिल्ह्यातील या आमदारानी केली 10 हजार कोरोना तपासणी किटची मागणी

प्रल्हाद कांबळे
Thursday, 10 September 2020

आरोग्यमंत्री, पालकमंत्री व आरोग्य प्रधान सचिवांना दिले पत्र

नांदेड - कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, नांदेड जिल्ह्यात अधिक गतीने नागरिकांची कोरोना तपासणी व्हावी, यासाठी नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर यांनी 10000 कोरोना तपासणी किटची मागणी आरोग्य मंत्री राजेश टोपे, जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण तसेच आरोग्य प्रधान सचिव व्यास यांच्याकडे केली आहे. लवकरात लवकर नांदेड जिल्ह्यासाठी दहा हजार कोरोना तपासणी किट दाखल होणार असल्याचे, मंत्री महोदयांनी सांगितले आहे.

सध्या नांदेड जिल्ह्यात दिवसागणिक 400 कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे कोरोना तपासणीला वेग यावा या करीता नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर यांनी कोरोना तपासणी किटची मागणी केली आहे. सध्या नांदेड जिल्ह्यातील आरोग्य विभागाकडे कोरोना तपासणी किटची कमतरता आहे. जर आपल्या येथील आरोग्य विभागाला या किट प्राप्त झाल्या तर नागरिकांची अधिक गतीने आरोग्य तपासणी होईल, अशी मागणी नागरिकांनी आ. बालाजी कल्याणकर यांच्याकडे केली होती.

हेही वाचा -  नांदेड : चिकाळा तांडा येथे गावठी दारूच्या हातभट्टयांवर पोलिसांची कारवाई -

नागरिकांनी घाबरून न जाता, आपल्या आरोग्याची अधिकची काळजी घ्यावी

त्यावर आ. बालाजी कल्याणकर यांनी  आरोग्य मंत्री राजेश टोपे, जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण व आरोग्य प्रधान सचिव व्यास यांची भेट घेऊन 10 हजार कोरोना तपासणी किटची मागणी केली. यावर संबंधित विभागाने आपल्या जिल्ह्यासाठी लवकरात लवकर दहा हजार कोरोना तपासणी किट देण्यात येतील असे सांगितले. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता, आपल्या आरोग्याची अधिकची काळजी घ्यावी, असे आव्हान आ. बालाजी कल्याणकर यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: This MLA from the district demanded 10 thousand corona inspection kits nanded news