नांदेड : मोबाईल शाॅपी फोडून, आपली मोबाईल शाॅपी चालविणारी टोळी जेरबंद, लाखोंचा ऐवज जप्त, भाग्यनगर पोलिसांची कारवाई

प्रल्हाद कांबळे
Thursday, 17 December 2020

यावरुन गुन्हे शोध पथकाने दोन चोरट्यांना अटक करुन त्यांच्याकडून ४२ किमती मोबाईल, एक एलईडी टीव्ही, दोन कॅमेरे आणि एक दुचाकी असा एकूण जवळपास अडीच लाखाचा ऐवज जप्त केला आहे.

नांदेड : भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पावडेवाडी परिसरातील एका दिव्यांगाची मोबाईल शाॅपी फोडून नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तुप्पा येथे आपली मोबाईल शाॅपी थाटणारी टोळी भाग्यनगर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून चोरलेले मोबाईल, एलईडी टीव्ही, कॅमेरे, घड्याळी आणि एक दुचाकी असा अडीच लाखाचा ऐवज जप्त केला. हे दोन्ही चोरटे सध्या पोलिस कोठडीत आहेत.

भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मागील अनेक दिवसापासून घरफोडी, चोरी, जबरी चोरी आदी घटनांत वाढ होत असल्याने पोलिस निरीक्षक अभिमन्यू सोळंके यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांना या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याच्या सूचना दिल्या. यावरुन गुन्हे शोध पथकाने दोन चोरट्यांना अटक करुन त्यांच्याकडून ४२ किमती मोबाईल, एक एलईडी टीव्ही, दोन कॅमेरे आणि एक दुचाकी असा एकूण जवळपास अडीच लाखाचा ऐवज जप्त केला आहे.

हेही वाचा नांदेड : कौडगाव शिवारात गोदावरी नदी पात्रातील अवैध रेती उपसा करणाऱ्या 13 व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल -

पोलिस निरीक्षक अभिमन्य सोळंके यांचे परिश्रम

भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मागील अनेक दिवसांपासून घरफोडी, चोरी, जबरी चोरी आदी गुन्ह्यांमध्ये वाढ होत होती. पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी सिद्धेश्वर भोरे यांनी या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी शहरात गस्त वाढविण्याच्या सूचना सर्वच ठाणादारांना दिल्या. यावरुन भाग्यनगरचे पोलिस निरीक्षक अभिमन्यू सोळंके यांनी आपल्या गुन्हे शोध पथकाला कार्यरत केले. पथकप्रमुख फौजदार श्री जाधव यांनी हवालदार श्री कळके, श्री जायभाये, श्री गर्दनमारे आणि राजू कांबळे यांना सोबत घेऊन आपल्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालण्यास सुरुवात केली.

गुन्हे शोध पथकाची कामगिरी

त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन त्यांनी वाजेगाव (तालुका नांदेड) येथील इरफानखान नसरतखान (वय २०) आणि धनेगाव (तालुका नांदेड) येथील असलमखान आगाखान वय २८) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत व शहरातील विविध पोलिस ठाण्याच्या परिसरात घरफोडी, चोरी जबरी, चोरी केल्याचे कबूल केले. यावरुन त्यांची पोलिस ठाण्यात आणून अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडील चोरलेले ४२ किंमती मोबाईल, एक एलईडी टीव्ही, दोन कॅमेरे आणि एक चोरीची स्कुटी असा अडीच लाखाचा ऐवज जप्त केला आहे. या दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडीत पाठवले आहे. या आरोपींकडून अजून काही गुन्हे उघडकीस येऊन मुद्देमाल जप्त होण्याची शक्यता श्री. सोळंके यांनी व्यक्त केली आहे. पथकाचे पोलिस अधीक्षक यांनी कौतुक केले आहे.

येथे क्लिक करानांदेड : माळेगाव यात्रेवर कोरोना, आचारसंहितेचे सावट, निर्णय लवकरच

असा झाला चोरीचा पर्दाफाश

मोबाईल शाॅपी फोडून आली दुकानदारी तुप्पा (ता. नांदेड) येथे सुरु केली. चोरट्यांनी पावडेवाडी येथील एका दिव्यांगाची मोबाईल शाॅपी फोडून त्यातील मोबाईल, एलईडी टीव्ही, दुचाकी आदी साहित्य चोरले. चोरी झालेले मोबाईल पोलिसांनी ईएमआय नंबरसह सायबर सेलमध्ये ट्रेकींला लावले होते. चोरट्यांनी मुखेड तालुक्यात विकलेल्या मोबाईल ट्रेस झाल्याने त्या व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याने पावती दाखवली मात्र ती बनावट होती. दुकान दाखविल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. चोर दुकानदारांनी कबुली दिली. त्यानंतर सर्व सामान जप्त करण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: mobile Burglary gang arrested, lakhs seized, action taken by Bhagyanagar police nanded news