esakal | नांदेड : खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना कोरोनाची लागन
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांच्यावर सध्या औरंगाबाद येथील महात्मा गांधी मिशनमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

नांदेड : खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना कोरोनाची लागन

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : राज्याचे बांधकाममंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्यानंतर, आमदार मोहन हंबर्डे, आमदार अमरनाथ राजूरकर, आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर आता खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांच्यावर सध्या औरंगाबाद येथील महात्मा गांधी मिशनमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहे. त्यांच्या प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. 

जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन अटोकाट प्रयत्न करत आहे. शहरासह ग्रामिण भागातही आता ॲटीजन रॅपीड टेस्टद्वारे तपासणी सुरु आहे. त्यामुळे कोरोना बाधीतांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तर अनेकांचा मृत्यू झाला. कोरोना बाधीतांची संख्या ही तीन हजाराजवळ पोहचली आहे. यात ग्रामिण भागातील नागरिकांसह अधिकारी, कर्मचारी आणि राजकिय मंडळीनाही कोरोनाची बाधा झाली आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांसह अनेक आमदारांना कोरोनाची लागन झाली आहे. सध्या माधवराव पाटील जवळगावकर आणि आमदार राजूरकर यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

हेही वाचा एकविसाव्या शतकाची आव्हाने पेलण्याइतके सक्षम धोरण - डॉ. व्ही. एन. इंगोले

संपर्कातील सर्वच जणांना क्वारंटाईन करण्यात आले 

खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे पुत्र जिल्हा परिषद सदस्य प्रविण पाटील चिखलीकर यांना मागील आठवड्यात कोरोनाची बाधा झाली होती. त्यांच्या संपर्कात आल्याने तब्बल आठ ते दहा दिवसांनी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना कोरोनाने घेरले. गुरुवारी रात्री त्याचा  कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. यानंत त्यांच्या संपर्कातील सर्वच जणांना क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांचीही तपासणी होणार आहे. खासदार चिखलीकर यांना औरंगाबाद येथील महात्मा गांधी मिशनमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे.

नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नका

जिल्ह्यात राजकिय पुढाऱ्यांसह अनेक अधिकाऱ्यांना कोरोनाची बादा झाली आहे. यात भाजपाचे जिल्हाध्यक्ष (ग्रामिण), शहर महानगराध्यक्ष प्रविण साले यांच्यासह आदींची समावेश होता. मात्र या सर्वांनी कोरोनावर मात करत विजय मिळविला. सध्या ही सर्व मंडळी पुन्हा जनसेवेत दाखल झाली आहे. नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नका, तोडांला मास्क, व सॅनिटायझरचा वापर वेळोवेळी करा असे आवाहन जिल्हा प्रशासन करीत आहेत. यासाठी पोलिस व महसुल विभाग आणि आरोग्य विभाग आपेल कर्तव्य पार पाडीत आहेत.