

नांदेड : तुम्ही नियमित बिल भरता का ?...त्याचे उत्तर हो असेल तर चिंता करू नका. कारण बिल नियमित जे भरणार नाहीत अशा ग्राहकांना प्राधान्याने स्मार्ट मीटर देण्यात येणार असल्याची माहिती महावितरणच्या सूत्रांकडून मिळाली आहे. महावितरणचे अधिकारी याबाबत स्पष्टपणे बोलत नसले तरी डिसेंबर २०२३ पर्यंत प्री - पेड व पोस्ट पेड असणारे असे स्मार्ट मीटर लावण्यात येणार आहेत. वीज बिलासोबतच आता स्मार्ट मीटरचाही बोजा ग्राहकांना पडण्याची शक्यता आहे.
राज्यातील वीज वितरण यंत्रणा स्मार्ट करण्यावर भर दिला जात आहे. महावितरणने तब्बल ३९ हजार ६०२ कोटींच्या सुधारित वितरण क्षेत्र योजनेत एक कोटी ६६ लाख ग्राहकांसाठी स्मार्ट वीजमीटर लावण्यात येणार आहेत. त्याला राज्य शासनाने नुकतीच मंजुरी दिली आहे. जिथे वितरण हानी १५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे, त्या शहरात आधी स्मार्ट मीटर लावले जातील. जुने मीटर चांगल्या स्थितीत असताना ते बदलून स्मार्ट मीटर देणार का?....याबाबत ग्राहकांमध्ये संभ्रम असून सध्या मीटरच्या तुलनेत स्मार्ट मीटर महाग राहणार आहे. त्याचे पैसे कुणी द्यायचे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
स्मार्ट मीटरचे फायदे
मोबाईलसारखे स्मार्ट मीटर रिचार्ज करता येईल.
मीटर पोस्ट पेड आणि प्रि पेड स्वरुपात उपलब्ध असेल
महावितरणला मीटर रिडिंगसाठी कर्मचारी पाठविण्याची गरज उरणार नाही
वापरलेल्या विजेची डेटा हिस्ट्री एका क्लिकवर मिळेल
ग्राहकांना वीज वापरावर नियंत्रण ठेवता येईल.
वीज वापरानुसारच बिल येईल.
वीजचोरीस आळा बसेल
प्री-पेडमध्ये जितके पैसे जमा आहेत त्यानुसारच वीज वापरता येईल.
वीज बिलातील त्रुटी दूर होऊन तक्रारी कमी होतील
मीटरमध्ये फेरफार झाल्यास त्याची सूचना मुख्यालयाला लगेच मिळेल.
रिचार्ज संपल्यास बत्ती गुल...
स्मार्ट मीटर महाग राहणार आहे
मध्यरात्री अचानक रिचार्ज संपल्यास उकाड्यात ग्राहकांना त्रास
रिचार्ज संपण्याबाबत ग्राहकांमध्ये राहणार धास्ती
ग्रामीण भागात शेतकऱ्यांसह अशिक्षितांना रिचार्जची समस्या
मोबाईल कंपन्यांसारखे पोस्टपेडमध्ये जास्त बिल येण्याची शक्यता
ग्राहकांना किती उपयोगाचे आहे, हे वापरल्यानंतच कळेल.
केंद्र सरकारची आहे योजना
केंद्र सरकारची ही योजना असून राज्यात अद्याप स्मार्ट मीटरची खरेदी सुरु झाली नाही. निविदा प्रक्रियेनंतर कोणत्या शहरात किती मीटर लावायचे हे ठरविले जाईल. मात्र, यात सर्व वर्गवारीतील एकूण एक कोटी ६६ लाख ग्राहकांना तसेच चार लाख सात हजार वितरण रोहित्र तर २७ हजार ८२६ वीज वाहिन्यांना स्मार्ट मीटर बसविण्याचे योजनेत प्रस्तावित आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.