Nanded Crime News
esakal
नांदेड : मुदखेड तालुक्यातील जवळा मुरार येथे गुरुवारी पहाटे एक धक्कादायक घटना उघडकीस (Nanded Crime News) आली. एका कुटुंबातील चारही सदस्यांनी आत्महत्या केल्याने संपूर्ण तालुका हादरून गेला आहे. घरात आई-वडील गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले, तर त्यांच्या दोन्ही मुलांनी मुगट शिवाराजवळ रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.