esakal | नांदेड : मुदखेड- पन्नास गावच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर; बारड, आमदुरा, माळकौठा, निवघा, पार्डी आरक्षित झाल्याने मातबरांची बत्ती गुल
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

यावेळी पंचायत समिती सभापती बालाजी सुर्यतळे, उपसभापती आनंदराव गादीलवाड, तहसीलदार दिनेश झांपले, नायबतहसीलदार संजय नागमवाड, नायबतहसीलदार तथा निवडणूक अधिकारी एस.एस.भोसीकर,लिपिक गजानन मठपती, विनोद मनवर,संचालक भिमराव कल्याणे,माधवराव शिंदे, बालाजी शिंदे,प्रल्हाद हाटकर, भाजपाचे प्रविण गायकवाड, शिवसेना तालुका अध्यक्ष संजय कुरे,पिंटू पाटील वासरिकर, आदी प्रमुख उपस्थित होते. 

नांदेड : मुदखेड- पन्नास गावच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर; बारड, आमदुरा, माळकौठा, निवघा, पार्डी आरक्षित झाल्याने मातबरांची बत्ती गुल

sakal_logo
By
गंगाधर डांगे

मुदखेड (जिल्हा नांदेड)  : मुदखेड तालुक्यातील पन्नास गावच्या सरपंच पदाचे आरक्षण आज ता.१९रोजी मुदखेड महसूल प्रशासनाच्या ईमारतीत तहसीलदार दिनेश झांपले यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सन २०२०-२५करिता सरपंच पदाची आरक्षण  सोडत जाहीर करण्यात आली आहे.

यावेळी पंचायत समिती सभापती बालाजी सुर्यतळे, उपसभापती आनंदराव गादीलवाड, तहसीलदार दिनेश झांपले, नायबतहसीलदार संजय नागमवाड, नायबतहसीलदार तथा निवडणूक अधिकारी एस.एस.भोसीकर,लिपिक गजानन मठपती, विनोद मनवर,संचालक भिमराव कल्याणे,माधवराव शिंदे, बालाजी शिंदे,प्रल्हाद हाटकर, भाजपाचे प्रविण गायकवाड, शिवसेना तालुका अध्यक्ष संजय कुरे,पिंटू पाटील वासरिकर, आदी प्रमुख उपस्थित होते. 

प्रथम अनुसूचित जाती आरक्षण सोडत प्रक्रिया ईश्वर चिठ्ठी नुसार ओम यशवंत महाजन या लहान मुलांच्या हस्ते काढण्यात आली. यामध्ये तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या बारड गावाचे सरपंच पद अनुसूचितजाती साठी राखीव झाले आहे. पार्डी वैजापूर अनुसूचित जाती, निवघा अनुसूचित जाती (महीला),

पिंपळकोठा मगरै अनुसूचित जाती (महीला), मेंडका अनुसूचित जाती,वाई अनुसूचित जाती(महीला),आमदुरा अनुसूचित जाती(महीला), पिपंळकौठा(चोर) अनुसूचित जाती, माळकौठा अनुसूचित जाती, चिलपिंपरि अनुसूचित जाती ( महीला),खुजडा अनुसूचित जाती, या गावातील सरपंच आरक्षण हे अनुसूचित जाती साठी राखीव करण्यात आले आहे.

तर सर्वसाधारणसाठी नागेली सर्वसाधारण (महिला), राजवाडी सर्वसाधारण,  डोंगरगाव सर्वसाधारण,बोरगाव नांद्री सर्वसाधारण (महिला),जवळा फाटक सर्वसाधारण( महिला), हिस्सा पाथरड सर्वसाधारण (महिला), पाथरड रेल्वे सर्वसाधारण, धनज सर्वसाधारण, खांबाळा सर्वसाधारण (महिला), वरधडा तांडा सर्वसाधारण, कोल्हा सर्वसाधारण (महिला), वाडी मुक्क्तारपूर सर्वसाधारण, मुगट सर्वसाधारण, वाडी मुक्ताजी सर्वसाधारण, चिकाळा सर्वसाधारण (महिला), चिकाळा तांडा मोठा सर्वसाधारण (महिला) चिकाळा तांडा लहान सर्वसाधारण, गोपाळवाडी सर्वसाधारण (महिला), पांगरगाव सर्वसाधारण (महिला), रोही पिंपळगाव तांडा सर्वसाधारण (महिला), वाडी नियमतुल्लापुर सर्वसाधारण (महिला), शंखतीर्थ सर्वसाधारण, टाकळी सर्वसाधारण (महीला), तिरकसवाडी सर्वसाधारण, या २५ गावात सर्वसाधारण गटातून १३ आरक्षण सोडत महिलासाठी झाली तर १२ जागेवर पुरुषासाठी सरपंच पदाचे आरक्षण सोडत पार पडली आहे. तर ना.मा.प्र. वर्गातून पांढरवाडी ना.मा.प्र (महिला), शेंबोली नामाप्र, वैजापूर पार्डी नामाप्र (महिला), सरेगाव नामाप्र (महिला), जवळामुरार नामाप्र (महिला), डोणगाव नामाप्र, हजापूर नामाप्र (महिला), ईजळी ना.मा.प्र, वासरी नामाप्र (महिला), देवापुर ना.मा.प्र,. कामळज नामाप्र, महाटी नामाप्र, दरेगाव नामाप्र, दरेगाव वाडी नामाप्र (महीला),

हेही वाचानांदेड विभागात चार लाख टन उसाचे गाळप, दोन लाख ६३ हजार क्विंटल साखरचे उत्पादन

या पद्धतीने संपूर्ण तालुक्यातील पन्नास गावचे आरक्षण सोडत प्रक्रिया तहसील प्रशासनाच्या ईमारत प्रांगणात पारदर्शकपणे यावेळी पार पाडण्यात आली. यावेळी तालुक्यातील पन्नास गावातून पदाधिकार्या सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुदखेड तालुक्याचे राजकारण बारड, मुगट, आमदुरा, माळकवठा, निवघा, रोहिपिंपळगाव, व पार्डी या प्रमुख गावातून चालत असते तालुक्याच्या राजकारणात या गावातील पुढाऱ्यांचा सतत मोठा दबदबा राहिला आहे आज आरक्षित झालेल्या ग्रामपंचायतीच्या आरक्षण सोडती मुळे या गावातील मातब्बरांच्या स्वप्नांची धुळी झाली असून अनेक मातब्बर यांचे आरक्षण गेल्यामुळे बत्ती गुल झाली आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image