esakal | नांदेड : मुदखेड सराफा लूटमारप्रकरणी मुख्य आरोपी पोलिस कोठडीत- सुनील निकाळजे
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

आरोपीने विविध ठिकाणी केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. या दोघांना सोमवारी (ता. नऊ) मुदखेड न्यायासयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडीत पाठविले आहे.

नांदेड : मुदखेड सराफा लूटमारप्रकरणी मुख्य आरोपी पोलिस कोठडीत- सुनील निकाळजे

sakal_logo
By
गंगाधर डांगे

मुदखेड (जिल्हा नांदेड) : मुदखेड, अर्धापूर व भोकर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पिस्तुलचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या टोळीतील मुख्य आरोपी व त्याच्या एका साथीदाराला मुदखेड पोलिसांनी रविवारी (ता. आठ) रात्री अटक केली. आरोपीने विविध ठिकाणी केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. या दोघांना सोमवारी (ता. नऊ) मुदखेड न्यायासयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडीत पाठविले आहे. 

मुदखेड येथील सराफा व्यापारी राघवेंद्र पबितवार हे ता. ३१ ऑक्टोबरच्या रात्री आठच्या सुमारास आपले दुकान बंद करुन नोकर शुभम चंद्रे हा दुकानातील साहित्य व नगदी रक्कम बॅगमध्ये ठेवून शटर बंद करत होते. यावेळी दुचाकीवरुन आलेल्या तीन हल्लेखोरांनी त्यांची दागिने असलेली बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. परंतु सराफा याने हातातील बॅग सोडली नाही. यावेळी संतप्त हल्लेखोरांनी त्यांच्या डोक्यात कुठल्यातरी घातक शस्त्राने वार केला. आयात ते जखमी झाले. एवढेच नाही तर त्यांच्यावर पिस्तूल रोखून धरले. मात्र पिस्तुलमधील मॅक्झिन खाली गळून पडल्याने मोठा अनर्थ टळला.

हेही वाचा -  नांदेड : उमरखेडमधील ढाणकी येथे ग्रामीण रुग्णालयाला मंजुरी- खासदार हेमंत पाटील -

सराफा लुटमार प्रकरणातील मुख्य आरोपी पोलिस कोठडीत

सराफा पबितवार आणि चंद्रे यांनी आरडाओरडा केल्याने आजूबाजूचे दुकानदार धावत येत असल्याचे पाहून हे तिन्ही चोरटे दुचाकीवरुन पसार झाले. याप्रकरणी मुदखेड पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय कबाडे यांनी चोरट्यांचा शोध घेण्याचे आदेश दिले. यावरुन मुदखेड ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील निकाळजे यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश भाले, हवालदार किरण तेलंगे, केशव पांचाळ, चंद्रशेखर मुंढे, विजय आलेवार, माधव पवार यांचे पथक गठित केले. या पथकाने दोन दिवसांपूर्वी या टोळीतील दोघांना अटक केली होती. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

अर्धापूर, भोकर हद्दीतील सराफा लुटमारीचे गुन्हे केले कबुल

अटक केलेल्या चोरट्यांच्या सांगण्यावरुन रविवारी रात्री पोलिस निरीक्षक सूनील निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकाने लक्ष्मण उर्फ लक्की बालाजी मोरे रा. सन्मित्र कॉलनी (ता. मुदखेड) आणि दीपक तारासिंह ठाकूर रा. चिरागगल्ली, नांदेड यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता या आरोपींनी मुदखेडचे सराफा व्यापारी पबितवार यांना लुटण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. तसेच अर्धापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आसना नदीवर नांदेडचे सराफा व्यापारी नंदकुमार लोलगे यांची सोन्या-चांदीचे दागिने ठेवलेली बॅग लंपास केल्याचीही कबुलू दिली. एवढेच नाही तर भोकर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रिठा येथे सराफा व्यापारी राजकुमार शहाणे यांनाही अडवून त्यांना पिस्तुलचा धाक दाखवून बॅग लंपास केल्याची कबुली दिली आहे.

येथे क्लिक करापरभणीचा पारा 8.8 अंश सेल्सिअसवर, शेकोट्या पेटल्या

दोघांनाही पोलिस कोठडी

दरम्यान अटक केलेल्या चोरट्यांना सोमवारी (ता. नऊ) मुदखेड न्यायालयासमोर हजर केले. या गुन्हेगारांकडून गुन्ह्यात वापरलेले शस्त्र व चोरीला गेलेला मुद्देमाल जप्त करावयाचा आहे. त्यासाठी त्यांना पोलिस कोठडी द्यावी अशी पोलिसांनी विनंती केली. न्यायालयाने विनंती मान्य करत त्यांना पोलिस कोठडीत पाठविले. या चोरट्यांकडून आणखी जिल्ह्यातील अन्य लुटमारीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता श्री निकाळजे यांनी व्यक्त केली आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे

loading image