Nanded : मालमत्ता कर वसुलीसाठी पालिकेची कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वसुली

Nanded : मालमत्ता कर वसुलीसाठी पालिकेची कारवाई

नांदेड : आयुक्त तथा प्रशासक डॉ. सुनील लहाने, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त निलेश सुंकेवार यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी (ता. दहा) झोन क्रमांक एक, चार, पाच आणि सहा येथे थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी कारवाई करण्यात आली.

झोन क्र एक तरोडा-सांगवी मधील महाराणा प्रताप सोसायटीमध्ये मालमत्ता धारकाकडे ७५ हजार ४५२ थकबाकी असल्यामुळे संबंधित मालकाने कर भरणा करण्यास नकार दिल्याने मालमता करापोटी त्यांची मालमत्ता जप्त करण्यात आली. क्षेत्रीय अधिकारी राजेशसिंह चौहाण पथकातील संतोष जिंतूरकर, विठ्ठल तिडके, साहेबराव ढगे, तोलाजी वाईकर, वैभव कांबळे यांनी ही कारवाई केली.

क्षेत्रीय कार्यालय क्रमांक चार मधील डॉ.लेन, सन्मान प्रेस्टीज येथील मालमत्ता धारकांकडून चार लाख ९३ हजार ५०९ कर थकीत असल्याने संबंधिताचे चार दुकाने सील करण्यात आली. क्षेत्रीय अधिकारी संजय जाधव व पथकातील रमेश वाघमारे, अजहर अली, किरण सिंग, हरदिपसिंग सुखमणी, गिरीश काठीवर व कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला. क्षेत्रिय कार्यालय क्रमांक पाच इतवारा अंतर्गत मालमत्तेवर एक लाख ५५ हजार ९२१ कर थकीत असल्याने व संबंधित मालकाने मालमत्ता कर भरणा करण्यास नकार दिल्याने संबंधिताचे ड्रेनेज खंडित करण्यात आले. क्षेत्रीय अधिकारी रावण सोनसळे, पथकातील जी जी तोटावाड व इतर कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला.

तसेच क्षेत्रीय कार्यालय क्रमांक सहा सिडको अंतर्गत अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्या उपस्थितीत, सिडको जप्ती पथक क्षेत्रीय अधिकारी डॉ. रईसोद्दीन, सधिरसिंह बैस व पथकाने सहा लाख ३२ हजार ८२२ रुपये अनाधिकृत बांधकाम शास्ती सह वसुल करण्यात आले.