
नांदेड विनापरवाना पाण्याचा जार प्लांट चालविणाऱ्या व्यावसायिकावर याहीपुढे प्लांट सील करण्याची कारवाई सुरुच राहणार आहे. त्यामुळे कोणतीही कारवाई थांबणार नाही अशा स्पष्ट शब्दात महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सुनील लहाने यांनी पाणी व्यावसायिकाच्या शिष्टमंडळाला सुनावले.
नांदेड : आपल्या फायद्यासाठी नांदेडकरांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या विनापरवानगी व निकृष्ठ पाणी पुरविणाऱ्या पाणी प्लांट व्यावसायींकावर महापालिकेने धडक कारवाई सुरु केली आहे. या कारवाईमुळे ऐन दिवाळीत पाणी प्लांट व्यावसायीक चांगलेच धास्तावले. आपल्या मागण्या व कारवाई थांबविण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळाला फैलावर घेऊन डाॅक्टर असलेल्या आयुक्तांनी इंजेक्शन दिले. कारवाया सुरुच राहतील असा दम त्यांनी लगावला.
नांदेड विनापरवाना पाण्याचा जार प्लांट चालविणाऱ्या व्यावसायिकावर याहीपुढे प्लांट सील करण्याची कारवाई सुरुच राहणार आहे. त्यामुळे कोणतीही कारवाई थांबणार नाही अशा स्पष्ट शब्दात महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सुनील लहाने यांनी पाणी व्यावसायिकाच्या शिष्टमंडळाला सुनावले. शहरातील पाण्याच्या जार प्लांट चालणारे अनेक व्यापारी शुक्रवारी (ता. सहा) महापालिकेमध्ये दाखल झाले. त्यांच्या शिष्टमंडळाने आयुक्तांकडे आजपर्यंतचे पाण्याची प्लांटवर करण्यात आलेल्या कारवाया केल्या त्याबद्दल न बोलता यापुढे पाण्याची प्लांटवर कारवाई करु नये.
हेही वाचा - कोरोना इफेक्ट : कुंभार व्यवसायीकांवर संकटाचे ढग -
कारवाई कदापिही थांबवणार नाही
दिवाळी असल्यामुळे कारवाई करण्यात सूट मिळावी अशी मागणी आयुक्तांकडे करण्यात आली. आयुक्त डॉक्टर सुनील लहाने यांनी संबंधित शिष्टमंडळाला आपण या संदर्भात प्लांट सील करण्याची कारवाई थांबवणार नाही. कारण प्लांट सील करण्याचे आदेश नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनल लवादाने दिले आहेत. किंबहुना महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाच्या विभागीय अधिकाऱ्यांनी देखील पाणी जार प्लांट बंद करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे पाण्याचे प्लांट बंद करण्याची कारवाई कदापिही थांबवणार नाही.
येथे क्लिक करा - नांदेडकरांना दिलासा : कोरोनावर नियंत्रण, मात्र सावधानता बाळगणे आवश्यक -
फिल्टरचे पाणी नागरिकांना मिळत नसल्यामुळे चांगलीच गैरसोय
यापूर्वी विनापरवाना असलेल्या पाणी प्लांटवर कारवाई करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर पुढे देखील पाणी प्लांट सील करण्याची कारवाई सुरुच राहणार आहे. औरंगाबाद महाराष्ट्र पोल्युशन बोर्डकडे आपण दाद मागावी असे आयुक्त सुनील लहाने यांनी पाणी प्लांट व्यावसायिकांच्या शिष्टमंडळाला सल्ला दिला. त्यामुळे पाणी प्लांट व्यवसायिक आयुक्तांच्या भूमिकेमुळे हतबल झाले आहे. शहरातील मनपाच्या कारवाईमुळे अनेक पाणी प्लांट बंद झाले आहेत. त्यामुळे शहरात हे पाणी प्लांट बंद असल्याने फिल्टरचे पाणी नागरिकांना मिळत नसल्यामुळे चांगलीच गैरसोय होत आहे.