

Nanded News
esakal
नांदेड: नांदेड-वाघाळा महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदासाठी वीरेंद्रसिंग गाडीवाले यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवड निश्चित झाली आहेस तर महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी सदिच्छा सोनी पाटील, उपसभापतिपदी निरंजना लांडगे यांचीही निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. सभापती पदासाठी एक आणि उपसभापती पदासाठी एक असे दोनच अर्ज दाखल करण्यात आले आहेत. या तिन्ही पदाधिकाऱ्यांची औपचारिक घोषणा मंगळवारी (ता. २४) होणाऱ्या महापालिकेच्या सभेत करण्यात येणार आहे.