

Nanded
esakal
नांदेड: नागरिकांचा वेळ वाचविण्यासह प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेने गुंठेवारी नियमितीकरण प्रक्रियेला पूर्णपणे ऑनलाइन केले आहे. त्यामुळे नागरिकांना गुंठेवारी प्रमाणपत्रासाठी महापालिकेच्या फेऱ्या मारण्याची गरज राहणार नसून, नोंदणीकृत आर्किटेक्ट, अभियंता किंवा सुपरवायझर यांच्या माध्यमातून प्रस्ताव सादर करून डिजिटल स्वाक्षरीयुक्त प्रमाणपत्र घरबसल्या मिळणार आहे.