

Nanded News
esakal
नांदेड: साडेतीन वर्षांनंतर प्रशासकीयराज संपुष्टात आल्यानंतर नांदेड-वाघाळा महानगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा सोमवारी सकाळी महापौर कविता संतोष मुळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
या सभेत शहरातील पाणीप्रश्न, स्वच्छता आदी पुरवठा आदी मूलभूत प्रश्न बाजूला सारत महापुरुषांच्या पुतळ्यावरून राजकारण तापले. त्यामुळे मनपाच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत गोंधळ उडाल्याने सभागृह दणाणल्याचे पाहायला मिळाले.