नांदेड : आरक्षण सोडतीनंतर इच्छुक महिलांचे यजमान लागले कामाला

प्रभागनिहाय फिफ्टी, फिफ्टीला छेद : सतरापैकी नऊ जागा महिलांसाठी राखीव
Nanded Nagar Panchayat Election women reservation declared
Nanded Nagar Panchayat Election women reservation declaredsakal

हिमायतनगर : हिमायतनगर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर झाली असून यामध्ये सर्वाधिक जागा या महिलांसाठी आरक्षित झाल्याने गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेले इच्छूक हे आपल्या अर्धांगिनीला निवडणुकीत उतरविण्याची तयारी उमेदवार करीत आहेत. नव्याने झालेल्या सुधारीत आरक्षण सोडतीत नऊ जागा या महिलांसाठी राखीव आहेत, तर आठ जागेवर पुरूषांना संधी मिळणार आहे. इतिहासात पहिल्यांदाच ओबीसी आरक्षण वगळून या निवडणूका होणार आहेत.

हिमायतनगर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यकाळ ता.२४ जानेवारी २०२१ ला संपला, परंतु देश्यात कोरोना सारख्या संसर्गजन्य महामारीने थैमान घातले म्हणून निवडणूक आयोगाने हा कार्यक्रम वेळेत जाहीर केला नाही, सातत्याने अडचणी निर्माण होत गेल्याने अनेक महिन्यांपासून रखडलेल्या निवडणुकीचा कार्यक्रम घेण्यात येणार असून ता.१३ जून ला सुधारित आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली असून नऊ जागा महिलांसाठी राखीव करण्यात आल्या आहेत. तर आठ जागा पुरूषांच्या वाट्याला आल्या आहेत. या ठीकाणी ग्राम पंचायत बरखास्त होवून नव्याने नगरपंचायत अस्तित्वात आल्यानंतर पहिल्यांदाच पार पडलेल्या निवडणुकीत काँग्रेसचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या नेतृत्वात काँग्रेसने १७ पैकी १० जागेवर विजय संपादन करून नगरपंचायतीवर एक हाती सत्ता प्रस्थापित केली होती.

यात शिवसेना चार, राष्ट्रवादी दोन, अपक्ष एक असे पक्षीय बलाबल होते, अडीच वर्ष पूर्ण झाल्यानंतर पहिलेच नगराध्यक्ष अ. अखिल अ. हमीद यांना दुसऱ्या टर्मसाठी नगराध्यक्ष पदासाठी संधी देणे काँग्रेसला चांगलेच महागात पडले. काँग्रेस नगरसेवकांच्या नाराजी नाट्यातून फार मोठे रामायण घडले. बंडखोर काँग्रेस नगरसेवकांच्या मदतीने शिवसेनेने नगराध्यक्ष पदावर कब्जा केला. हदगाव, हिमायतनगर विधानसभा मतदार संघात परंपरागत एकमेकांचे प्रतिस्पर्धी राहत आलेले काँग्रेस आमदार माधवराव पाटील जवळगावकर व शिवसेनेचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्यात या निमित्ताने टोकाचा संघर्ष पहायला मिळाला.

आता राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असल्याने आमदार माधवराव पाटील जवळगावकर व माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांना जुळवून घ्यावे लागले, गेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दोघेही एकाच व्यासपीठावर दिसून आले. मात्र जेव्हा-केव्हा हिमायतनगर नगरपंचायतचा विषय येतो तेव्हा आमदार जवळगावकर हे माजी आष्टीकरावर टिका करतातच हे विशेष. आगामी नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना व काँग्रेस हे महाविकास आघाडीला छेद देऊन वेगवेगळे लढतील असे पुर्वी पासुनचे संकेत आहेत. या वेळी शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांचीही भूमिका आगामी निवडणुकीत महत्वपूर्ण ठरणार आहे.

नगरपंचायत निवडणूक रंगतदार ठरणार

भाजपचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी हिमायतनगर नगरपंचायतवर लक्ष केंद्रित केले असल्याने भाजप ही आगामी निवडणुकीत जोरशोरशे निवडणूक रिंगणात जिंकण्याच्या इराद्याने उतरणार आहे. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नगरसेवक निवडून आले होते. या वेळेस माजी उपनगराध्यक्ष म. जावीद अ. गण्णी हे राष्ट्रवादीत डेरेदाखल झाले असल्याने राष्ट्रवादीला काही प्रमाणात बळ मिळाले आहे. आगामी निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी, मनसे, बसपा, प्रहारसह अनेक पक्ष संघटना निवडणुकीत उतरणार आहेत. त्यामुळे नगरपंचायत निवडणूक मोठी रंगतदार ठरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com