

Nanded
esakal
नायगाव: आधीच घरची प्रतिकूल परिस्थिती, त्यातच पतीलाही अर्धांगवायूचा झटका आल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला. परंतु, अशाही परिस्थितीत खचून न जाता घुंगराळा (ता. नायगाव) येथील संगीता गुणाजी सुगावे यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द, धैर्य आणि कष्टाच्या बळावर स्वतःचा हॉटेल व्यवसाय थाटून कुटुंबाला पुन्हा उभे केले.