esakal | नांदेड : कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष मजबुत करणार- संतोष दगडगावकर

बोलून बातमी शोधा

file photo}

या बैठकीला पक्षाचे निरीक्षक म्हणून राष्ट्रवादी ग्रंथालय विभागाचे जिल्हाध्यक्ष तथा राज्य ग्रंथ निवड समितीचे सदस्य संतोष दगडगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

नांदेड : कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष मजबुत करणार- संतोष दगडगावकर
sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : भोकर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख तालुका असणाऱ्या व काॅग्रेसचा बालेकिल्ला तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या मुदखेड तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे संघटन वाढवून पक्ष बळकट करु. आगामी सर्व निवडणुका संपूर्ण ताकदीनिशी लढवू, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष निरीक्षक संतोष दगडगावकर यांनी व्यक्त केले. या बैठकीला पक्षाचे निरीक्षक म्हणून राष्ट्रवादी ग्रंथालय विभागाचे जिल्हाध्यक्ष तथा राज्य ग्रंथ निवड समितीचे सदस्य संतोष दगडगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी रिक्त असलेल्या पक्षाच्या पदांवर नियुक्त्या करणे याबाबत चर्चा करण्यात आली. इच्छुकांनी या बैठकीत आपले पक्षातील कार्याबद्दल माहिती देऊन पद देण्यासंदर्भात आपले मनोगत व्यक्त केले. पक्षातील सर्व पदाधिकारी यांनी गटा- तटाचे राजकारण न करता पक्षाचे संघटन मजबूत करुन पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार साहेबांचे हात बळकट करण्याचे आवाहन संतोष दगडगावंकर यांनी केले. तसेच यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना निरीक्षकांनी मार्गदर्शन करुन पक्ष वाढीसंदर्भात व आगामी निवडणुकीबाबत सूचना केल्या.

या बैठकीचे सूत्रसंचलन राष्ट्रवादी कॉंग्रेस पदवीधर सेलचे तालुकाध्यक्ष प्रा. संदीप पवार निवघेकर यांनी केले व राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष शिवानंद पाटील शिप्परकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी बसपाचे संतोष दर्शनवाड यांनी पक्षप्रवेश केला. या बैठकीला विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत मांजरमकर, अल्पसंख्याक माजी जिल्हाध्यक्ष मकसूद पटेल, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस चक्रधर पाटील कळणे, राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या पूजा पाटील व्यवहारे, पदवीधर संघाचे तालुकाध्यक्ष प्रा. संदीप पवार निवघेकर, म. बुऱ्हाण, आशिष कल्याणे, प्रशांत मुंगल, शंकर खवास, माधव पाटील व्यवहारे यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुदखेड शहर व तालुक्यातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.