

Latest Nanded News: हक्काप्रती जागरूक असलेले जिल्हा परिषदेचे शिक्षक विद्यार्थी घडवण्यात मात्र कमी पडत असल्याने शैक्षणिक दर्जा रसातळाला गेला आहे. परिणामी मागच्या दोन वर्षांत नायगाव तालुक्यातील तब्बल अडीच हजार विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेला रामराम ठोकला आहे.
मोठ्या प्रमाणात गळती लागल्यानंतरही जिल्हा परिषद जागे होत नसल्याने जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनाच शाळा बंद करायच्या नाहीत ना अशी शंका येत आहे.