Nanded News : नशा करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर...

वजिराबाद ठाण्यात बैठक; केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनची घेणार मदत
nanded news
nanded news sakal

नांदेड - शहर आणि जिल्ह्यात गुन्हेगारांकडून विविध प्रकारच्या नशेचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे या नशेमध्ये गुन्हेगार गंभीर स्वरूपाचे गुन्हे करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या अनुषंगाने जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांकडून आता नशा करणाऱ्यांवर करडी नजर राहणार आहे. त्याचबरोबर केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्ट असोशिएशनची देखील मदत घेण्यात येणार आहे.

पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी (ता. ३०) वजिराबाद पोलिस ठाण्यात उपविभागीय पोलिस अधिकारी सुरज गुरव यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील केमीस्ट अॅन्ड ड्रगीस्ट असोशिएशनचे पदाधिकारी आणि विक्रेते यांची बैठक घेण्यात आली.

nanded news
Nagpur News : गर्भनिरोधक साधने कुचकामी ठरल्याने हजारांवर गर्भपात!

यावेळी वजीराबाद ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड, फौजदार रमेश खाडे, पोलीस अंमलदार माधव मरेकंटलु, केमीस्ट अॅन्ड ड्रगिस्ट असोशिएशनचे अध्यक्ष शंतनु कोडगिरे, सचिव डॉ. राहुल लव्हेकर, संजय मोटे, सदस्य लक्ष्मीकांत लोकमनवार, रामदेव दाढ, श्रीकांत गुंजकर, अब्दुल वारी. सय्यद इकबाल, गिरीष देशमुख तसेच पदाधिकारी व मेडीकल दुकानदार उपस्थित होते.

nanded news
Pune News : पुण्यातील ‘रूफ टॉप हॉटेल’वर गुन्हा दाखल होणार; महापालिकेचा इशारा

सदर बैठकीमध्ये मेडीकल दुकानदासोबत गुंगीकारक औषधीपासुन होणाऱ्या परीणामाबाबतची चर्चा करण्यात आली. दुकानदारांनी डॉक्टरांच्या सल्याशिवाय कोणत्याही प्रकारचे औषध विक्री करू नये, गुंगीकारक औषधी द्रव्य ज्यामध्ये अल्फ्राझोलम, नायट्रोसन, लुमोटीन, कोरॅक्स, कोडीन, ट्रॅमाडौल व इतर गुंगीकारक इंजेक्शन हे कोणत्याही परिस्थीतीमध्ये डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय विक्री करु नयेत, प्रत्येक मेडीकलधारकांनी आपले मेडीकलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, ज्यापैकी एक कॅमेरा हा प्रमुख रस्त्याच्या दिशेचे संपूर्ण व्हिडीओ चित्रीकरण करणारा असावा.

nanded news
Mumbai News : ‘नीती’च्या माध्यमातून मुंबई गिळण्याचा डाव - संजय राऊत

ज्या मेडीकलधारकांना २४ तास मेडीकल चालविण्याचा परवाना नाही त्यांनी त्यांना नेमुन दिलेल्या वेळेमध्येच आपले मेडीकल बंद करावेत. ज्या मेडीकलधारकांना २४ तास मेडीकल चालविण्याचा परवाना आहे. त्यांनी रात्रीचे वेळी एकच खिडकी चालु ठेवावी.

nanded news
Aithey Aa Song : 'भारत'चं तिसरं गाणं 'ऐथे आ' प्रदर्शित

गुंगीकारक औषधीची मागणी करण्यासाठी कोणी आल्यास तत्काळ फोन करण्यासाठी पोलीस अधिकारी यांचे फोन नंबर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत तसेच डायल ११२ या क्रमांकावर तत्काळ माहिती देण्याबाबत सुचित करण्यात आले आहे. सदर बैठकीत पोलीसांनी दिलेल्या सुचनाप्रमाणे कार्यवाही करण्याबाबत आणि पोलीसांना मदत करण्याबाबत केमीस्ट अॅन्ड ड्रगीस्ट असोशिएशनचे पदाधिकारी यांनी आश्वासन दिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com