esakal | नांदेड : निराधार, दिव्यांग विविध योजनेतील अनुदान जमा- गंगाधर बडूरे
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

दोन दिवसात लाभार्थ्याना मिळणार असल्याचे तहसीलदार गजानन शिंदे यांनी सांगितले आहे. 

नांदेड : निराधार, दिव्यांग विविध योजनेतील अनुदान जमा- गंगाधर बडूरे

sakal_logo
By
चंद्रकांत सुर्यतळ

बरबडा ( जिल्हा नांदेड ) : नायगांव तालुक्यातील निराधार, श्रावण बाळ, अपंग, विधवा यासह विविध योजनेतील चार महिण्याचे मानधन एक कोटी ३३ लाख १५ हजार पोस्टात जमा करण्यात आले असून. दोन दिवसात लाभार्थ्याना मिळणार असल्याचे तहसीलदार गजानन शिंदे यांनी सांगितले आहे. 

नायगांव तालुक्यात संजय गांधी निराधार, दिव्यांग, श्रावण बाळ, इंदिरा गांधी निवृत्ती वेतन, विधवा यासह वेगवेगळ्या योजनेतील तीन हजार ६२६ लाभार्थ्याचे चार महिण्यापासून अनुदान रखडले होते. नुकतेच एक कोटी ३३ लाख १५ हाजार ८०० रुपये नायगांव तहसीलमध्ये प्राप्त होताच तहसीलदार गजानन शिंदे यांनी डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या चार महीन्याचे मानधन लाभार्थ्याच्या खात्यात संबधीत पोस्टात जमा करण्यात आले असल्याचे सांगितले आहे. 

हेही वाचानांदेड आरटीओ कार्यालयात कोरोनाचा शिरकाव; कार्यालय 30 एप्रिलपर्यत बंद

लाॅकडाऊनच्या काळात प्रत्येक माणूस अडचणीत आहे. निराधाराचे थकीत मानधन त्वरित मिळावे यासाठी संजय गांधी निराधार समितीचे नायगांव तालुका अध्यक्ष तथा शिवसेना उपजिल्हा प्रमुख गंगाधर बडुरे यानी शासनस्तरावर प्रयत्न केल्याने हे मानधन त्वरित मिळाल्याने महाविकास आघाडी सरकारने निराधाराना ऐन संकटात चार महिण्याचे मानधन एकाच वेळी देऊन त्यांना आधार दिल्याची भावना शिवसेननेचे उपजिल्हा प्रमुख गंगाधर बडुरे यांनी  व्यक्त केली आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

loading image