नांदेड : लोहा शहरातील भटक्यांच्या पालातील पोरं आता नवा मार्ग शोधू लागले

file photo
file photo

लोहा (जिल्हा नांदेड) :  " ज्यांना हक्काचं घर नाही भूमीवर अंथरुण आणि आकाशाचे पांघरुण करुन ही पालावरची पोरं सताड उघड्या माळावर आपली वस्ती करुन राहतात. कोरोना काळानंतरही तग धरुन राहणारी भटक्यांची पालं नि त्यातील पोरं आता नवा मार्ग शोधू लागले आहेत.

पालावरची पोरं मध गोळा करुन संसाराला हातभार लावत आहेत. या भटक्यांना आपल्या हक्काचे घरं असावीत यासाठी गेल्या दोन दशकांत मोठी आंदोलने झाली. पण अजूनही त्यांना आपल्या हक्काचं घर मिळालेले नाही. मध्यंतरी तत्कालीन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिवाळीच्या सणात फराळ देऊन त्यांना आपल्या हक्काचे घर घेण्याचा प्रयत्न केला होता. तोही शेवटी निष्फळ ठरला. येथील साठ उंबरठा असलेली पालं पोटासाठी झगडत आहेत.    अन्नासाठी दररोज हातातोंडाची गाठ पडण्यासाठी दिवसभर भटकंती करत असतात. कुणी वेठबिगार काम करतो, कुणी खानावळीत तर कुणी मध गोळा करुनउदरनिर्वाह करतो.

डवरी, गोसावी, कंजारभाट, वैदू, कोल्हाटी, जोशी, डोंबारी, कैकाडी, वडारी, पारधी, नंदीवाले, मातंग गारुडी, काशी कापडी, सिकलीकर, रजपूत भामटा, दसनाम गोसावी, गोपाळ, टकारी, घिसाडी, छप्परबंद अशा भटक्यांची पालं आदलून- बदलून लोहा शहराच्या शिवाजी चौकामध्ये उतरत असतात. रायरंद, मरीआईवाला, बहुरुपी, नाथपंथी, रावळ या जमातीतील काही मुलं- मुली शाळा शिकवतत.  मुन्ना अर्जुन नक्कलवाड नंदीबैलवाला दहाव्या वर्गातील विद्यार्थी आयटीआयसाठी प्रयत्न करतो आहे. दहावीला त्याला पन्नास टक्के मार्क मिळाले आहेत. मात्र त्यास वेटबिगारी कामाशिवाय पर्याय नसल्याचे त्याचे वडील अर्जुन नक्कलवाड हे 'सकाळ' शी बोलताना सांगतात. फारसे शिक्षण नसलेल्या या भटके समाजासाठी साक्षरता नाही. व्यसनाधीनतेचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. आयते खाण्याची सवय वाढीस लागली आहे. भिक्षा मागून डाळ आणि गहू मागून आणायचे आणि सायंकाळी किराणा दुकानावर विकून मोबदल्यात जुगार आणि दारु प्यायची हा नित्यक्रम वाढला आहे. या गोष्टीपासून या भटक्यांना दूर करण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढे येण्याची गरज आहे.
भटक्यांच्या स्त्रियांना बचत गटाचा आर्थिक आधार मिळाला तर या ठिकाणी नक्कीच लघुउद्योग होतील पण त्यांचे स्थलांतर थांबले पाहिजेत अशी भावना लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ. साहेब खंदारे यांनी बोलून दाखवली.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com