
लोहा (जिल्हा नांदेड) : ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेला आज पासून नामांकन भरण्यास सुरुवात होत आहे. लोहा तालुक्यातील ८४ ग्रामपंचायत साठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी २८ निवडणूक निर्णय अधिकारी व ४० सहायक निवडणूक अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पण मंगळवारी (ता. २२) तहसिलदार विठ्ठल परळीकर यांनी घेतलेल्या महत्वपूर्ण प्रशिक्षणास सहा निवडणूक निर्णय अधिकारी व १५ सहायक निवडणूक अधिकारी गैरहजर होते. त्यासर्वाना तात्काळ नोटीस बजावन्यात आल्या असून २४ तासाच्या आत खुलासा करा अन्यथा कारवाई करु असे कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात आल्या आहेत अशी माहिती तहसिल निवडणूक विभागाने दिली.
तालुक्यात ८४ ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेला आजपासून आरंभ होतो आहे. जवळपास एक लक्ष ७४ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे.ही निवडणूक प्रक्रिया सुरळीत व निवडणूक आयोगाच्या वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार पार पडावी यासाठी तहसीलदार विठ्ठल परळीकर व त्यांची टीम ज्यात नायब तहसीलदार राम बोरगावकर, नायब तहसीलदार अशोक मोकले, निवडणूक नायब तहसीलदार श्री. देवराये, निवडणूक विभागाचे प्रमुख तिरुपती मुंगरे, अव्वल कारकून श्री. बडवणे, सहायक प्रशांत अपशेट्टे, ऑपरेटर सूर्यकांत पांचाळ, श्री. मळगे हे रात्री उशिरापर्यंत तहसिल कार्यालयात काम करीत आहेत.
हेही वाचा - नांदेड : वाटमारी करणाऱ्या दरोडेखोरांना पोलिस कोठडी- पावणेपाच लाख जप्त, कुंटुर पोलिसांची कारवाई
तहसीलदार परळीकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी व त्यांचे सहायक अधिकारी यांची निवडणूक प्रक्रियेला प्रत्यक्षात बुधवार(ता. २३) पासून आरंभ होतो आहे. त्याससाठी बैठक व प्रशिक्षण घेतले पण यात सहा निवडणूक निर्णय अधिकारी गैरहजर होते तर १५ सहायक निवडणूक अधिकारी यांनीही दांडी मारली. त्यामुळे बैठक संपताच या गैरहज राहणाऱ्या २१ कर्मचऱ्याना ज्यात पंचायत समिती विस्तार अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, शाखा अभियंता, ग्रामसेवक सहायक प्रशासन अधिकारी यांचा समावेश आहे. त्यासर्वाना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. लोकप्रतिनिधी अधिनियम कायद्या अन्वये निवडणूक प्रशिक्षणास आपण गैरहजर राहिलात, त्यासाठी नोटीस बजावल्या तेंव्हापासून २४ तासाच्या आत समक्ष हजर राहून आपले म्हणणे सादर करावे, अन्यथा आपले काही म्हणणे नाही असे समजून लोकप्रतिनिधी अधिनियम कायद्यान्वव्ये आपल्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे बजावन्यात आले आहे.
प्रशिक्षणास पंचायत समिती व कृषी कर्मचाऱ्यांची दांडी
ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी तहसिलदार यांच्या अधिकारात ही प्रक्रिया पूर्ण केली जाते त्यासाठी लागणारे अधिकारी, कर्मचारी तहसील कार्यालयाकडे संबधित विभाग प्रतिनियुक्त करते. निवडणूक निर्णय अधिकारी व त्यांना सहायक अधिकारी म्हणून पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी व कार्यालयातील अधिकारी व कृषी कार्यालयातील कृषी सहायक यांच्या नियुक्त्या केल्या आहेत.
संपादन - प्रल्हाद कांबळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.