नांदेडमध्ये दोन कोरोना बाधीत रुग्णांची वाढ, रुग्णसंख्या गेली १५४ वर

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 3 June 2020

शहरातील ईतवारा भागात बाधीत रुग्णाच्या संपर्कात आलेली ४१ वर्षीय महिला व भेंडेगाव (ता. मुखेड) येथील एका २१ पुरुष रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या १५४ झाली आहे.

नांदेड : कोरोना तपासणीसाठी पाठवलेल्या १०१ अहवालापैकी बुधवारी (ता. तीन) सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार ८९ अहवाल निगेटिव्ह तर दोन अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये शहरातील ईतवारा भागात बाधीत रुग्णाच्या संपर्कात आलेली ४१ वर्षीय महिला व भेंडेगाव (ता. मुखेड) येथील एका २१ पुरुष रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या १५४ झाली आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली.  

जिल्ह्यात मागील २४ तासामध्ये पाच कोरोना बाधितांचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यानुसार मंगळवारी (ता. दोन) सायंकाळी प्राप्त झालेल्या ६७ अहवालापैकी ६० निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले. नवीन तीन रुग्णांचा स्वॅब पॉझिटिव्ह आला होता. बाधीत तीनही रुग्ण शहरातील आहेत या रुग्णामध्ये एक सात वर्षांची मुलगी, चार वर्षाचा मुलगा हे रुग्ण शहरातील लोहार गल्ली येथील तर ५५ वर्षे वयाचा एक पुरुष रुग्ण कुंभारटेकडी सराफा बाजार येथील आहे. 

हे ही वाचानांदेड शहरातील वाहतुक सुरू, सिग्नल बंद ​
 
बुधवारी (ता.दोन) सकाळी प्राप्त झालेल्या १०१ अहवालापैकी ८९ अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. नविन दोन रुग्णांचा अहवाल  पॉझिटीव्ह आल्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १५४ झाली आहे. या दोन रुग्णामध्ये शहरातील इतवारा भागात कोरोना बाधीत रुग्णाच्या संपर्कात आलेल्या एक ४१ वर्षीय महिला व भेंडेगाव (ता. मुखेड) येथील एका २१ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. मुखेड येथील कोरोना केअर सेंटरमध्ये भेंडेगावच्या रुग्णावर उपचार सुरू आहेत. 

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर “आरोग्य सेतू ॲप” डाऊनलोड करुन घ्यावे जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल असे डॉ. भोसीकर यांनी स्पष्ट करुन प्रशासनास जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

येथे क्लिक करापॉझिटिव्ह न्यूज - सहा महिन्याच्या चिमुकलीने कोरोनाला हरवले...​
 
शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार वारंवार साबणाने हात धुवावेत, सोशल डिस्टन्सचे काटेकोर पालन करुन गरज असल्यासच घराबाहेर पडण्याचा सल्ला देण्यात येत आहे. लॉकडाऊनमध्ये सवलत जारी करण्यात आली असली तरी कोरोना महामारीचे गांभीर्य राखून नागरीकांनी सुचनांचे पालन करावे. त्याच बरोबर आपल्या परिसरात ईतर जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांची माहिती दक्षता समिती, आरोग्य विभागास कळवावी. आरोग्य विभागामार्फत कोरोना विषयी जागृती करण्यात येत असून आपल्याकडे येणाऱ्या कोरोना वॉरिअर्स यांना खरी महिती सांगून सहकार्य करण्याचे अवाहन करण्यात आले आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Nanded, the number of patients infected with two corona has increased to 154,Nanded News