esakal | नांदेड : एका घटनेत शेतकऱ्याची तर दुसऱ्या घटनेत विद्यार्थीनीची आत्महत्या 

बोलून बातमी शोधा

file photo}

ही घटना नागेली (ता. मुदखेड) शिवारात ता. 25 फेब्रुवारीच्या सकाळी आठच्या सुमारास घडली.

नांदेड : एका घटनेत शेतकऱ्याची तर दुसऱ्या घटनेत विद्यार्थीनीची आत्महत्या 
sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : सतत होणारी नापिकी व बँकेच्या कर्जाची तसेच थकित वीज बिलाच्या त्रासामुळे नैराश्यग्रस्त शेतकऱ्याने विष प्राशन करुन आत्महत्या केली. ही घटना नागेली (ता. मुदखेड) शिवारात ता. 25 फेब्रुवारीच्या सकाळी आठच्या सुमारास घडली. या प्रकरणाच बारड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी की मुदखेड तालुक्यातील नागेली येथील शेतकरी संजय कचरु गव्हाणे (वय 42) यांच्या शेतावर मागील काही दिवसापासून सततची नापिकी होत होती. तसेच त्यांच्या वडिलांच्या नावे असलेल्या बँकेच्या कर्जाचा डोंगर वाढत होता. त्यातच त्यांच्याकडे महावितरणची वीज बिल सुद्धा थकले होते. या तिहेरी संकटात असलेल्या शेतकऱ्याने कर्जाची परतफेड वेळेत करु शकत नसल्याने मागील काही दिवसांपासून चिंतेत होता. शेवटी त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. आणि त्याने ता. 25 फेब्रुवारी रोजी नागेली शिवारात असलेल्या आपल्या शेतातील आखाड्यावर विषप्राशन केले. त्याला नातेवाईकांनी बारड येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरु असताना मृत्यू झाला. सदाशिव कचरु गव्हाणे यांच्या माहितीवरुन बारड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

धर्माबाद येथे विद्यार्थिनीची आत्महत्या 

साक्षी रमेश कुंटूरवार (वय 19) ही विद्यार्थीनी मुखेड येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती. परंतु विद्यार्थिनीच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती गरीब असल्याने आपले शिक्षण पूर्ण होणार नाही म्हणून तीने राहत्या घरी तीने छताच्या हुकाला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना ता. 26 फेब्रुवारी रोजी शंकरगंज, धर्माबाद येथे घडली. या प्रकरणी सुधाकर विठ्ठल कुंटुरवार यांच्या माहितीवरुन धर्माबाद पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.