esakal | नांदेड : राष्ट्रीय महामार्गावर सकाळी झालेल्या अपघातात एक ठार, दोन गंभीर 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

शारदा कन्स्ट्रक्शन च्या कॅम्परला केटीसी ट्रकची धडक...

नांदेड : राष्ट्रीय महामार्गावर सकाळी झालेल्या अपघातात एक ठार, दोन गंभीर 

sakal_logo
By
साजिद खान

वाई बाजार (माहूर, जि.नांदेड) :  माहूर - किनवट ला जोडणाऱ्या धनोडा ते कोठारी राष्ट्रीय महामार्गावर (ता. १२) रोजी सकाळी साडेआठ ते नऊच्या सुमारास  ट्रकने कॅम्पर वाहनाला जब्बर धडक दिल्याने एक जण ठार, दोन गंभीर तर सहा जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींवर ग्रामीण रुग्णालय माहूर येथे उपचार करून पुढील उपचारासाठी यवतमाळला पाठविण्यात आले आहे.

पालाईगुडा फाटा ते सारखणीच्या दरम्यान आज सकाळी खान ट्रान्सपोर्ट कंपनी (केटीसी) चंद्रपूरच्या सिमेंटवाहू बोलझो वाहन  (एम.एच.३४ बी.जी.६५८९) या वाहनाने शारदा कन्स्ट्रक्शन कंपनी नांदेडच्या महिंद्रा बोलेरो कॅम्पर (एम.एच.२६ बी.ई.४३५०) या वाहनाला धडक दिल्याने या गाडीतील कामावर जात असलेल्या मजुरांना पैकी एक जण ठार, दोन गंभीर जखमी तर सहा जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिलेली आहे. गंभीर जखमींवर माहूर ग्रामीण रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी शासकीय जिल्हा रुग्णालय यवतमाळ येथे पाठवण्यात आले असून किरकोळ जखमींवर माहूर येथे उपचार सुरू आहे. घटनास्थळावर सिंदखेड पोलीस ठाण्याचे बी. जी. राठोड, संतोष मोकले हजर होऊन घटनास्थळ पंचनामा करून केटीसीचे ट्रक ताब्यात घेतले आहे. शिवाय गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. बातमी लिहीपर्यंत घटनेतील मयत व जखमींची नावे समजू शकली नाही.

हेही वाचा  नांदेड जिल्ह्यात पुन्हा दुचाकी चोरीच्या घटना; पोलिसांचे हवे लक्ष

राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका थांबेना

कोठारी ते धनोडा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ अ चे रस्ता बांधकाम सुरू झाल्यापासून आज तागायत शेकडोच्या संख्येत गंभीर तसेच किरकोळ अपघात घडले आहेत.कालच माहूर तालुक्यातील मुरली फाट्याजवळ एसटी महामंडळाच्या बसने धूळ यामुळे समोरचे वाहन न दिसून आल्याने केटीसी च्या ट्रकला दिलेल्या धडकेत ४३ प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली होती.तोच आज सकाळी याच महामार्गावर अपघात होऊन एका मजुराला आपला जीव गमवावा लागला तर दोन जण गंभीर झालेत.एकंदरीत या सर्व घटना राष्ट्रीय महामार्ग बांधकाम कंत्राटदार कंपनीच्या बेदरकार धोरणाचा परिपाक असून रस्त्यावर पाण्या अभावी प्रचंड धुरळा निर्माण होऊन समोरचे वाहन दिसणेही कठीण बनले आहे.व काही ठिकाणी सिमेंट बांधकाम झालेल्या रस्त्याच्या कडेला बाजू भरून न झाल्याने अपघात सहजपणे होत आहे.बांधकाम  कंपनीने अपघात होण्यासारखी परिस्थिती निर्माण करून दिल्यामुळेच दररोज गंभीर तसेच किरकोळ अपघात घडत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत.परंतु त्यांच्या तक्रारीची दखल राष्ट्रीय महामार्ग विभाग घ्यायलाच तयार नाही.त्यामुळे या मार्गावरील अपघाताची मालिका काही केल्या थांबत नाही हे विशेष

पोटाची खळगी भरण्यासाठी अंतर जिल्ह्यातील अनेक रस्ता बांधकामावर काम करणारे मजूर आपल्या दिनक्रमानुसार अपघात ग्रस्त झालेल्या वाहनातून जाणे येणे करतात.नित्याप्रमाणे कामावर जात असलेल्या मजुरावर काळाने दिवाळीच्या पहिल्या दिवस वसुबारस दिनी घाला घातला आणि त्या मजुराला आपला जीव गमवावा लागल्याने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे

loading image