नांदेड -  १९ हजार पैकी ९७ टक्के रुग्णांची कोरोनावर मात, रविवारी ५५ जण पॉझिटिव्ह, ४५ जण कोरोनामुक्त 

शिवचरण वावळे
Sunday, 1 November 2020

रविवारी (ता. एक) एक हजार ४५ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये ९८१ निगेटिव्ह, तर ५५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा १९ हजार १७४ वर पोहचला आहे.

नांदेड - सध्याची कोरोनामुक्त रुग्णांची अकडेवारी बघता दिवाळीपूर्वीच जिल्हा कोरोनामुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. रविवारी (ता. एक) प्राप्त झालेल्या अहवालात केवळ ५५ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली, एका बाधिताचा मृत्यू, तर उपचार सुरू असलेल्या बाधित रुग्णापैकी ४५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. हे प्रमाण एकूण कोरोनाबाधित रुग्णांच्या ९७ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. 

शनिवारी (ता.३१) तपासणीकरिता घेण्यात आलेल्या स्वॅब अहवालापैकी रविवारी (ता. एक) एक हजार ४५ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये ९८१ निगेटिव्ह, तर ५५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा १९ हजार १७४ वर पोहचला आहे. दुसरीकडे रविवारी दिवसभरात खासगी रुग्णालयात उपचार सुरू असलेल्यापैकी विष्णुपुरी येथील पुरुष (वय ६५) या बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. उपचारादरम्यान आतापर्यंत जिल्ह्यातील ५१४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

हेही वाचा- मुदखेड शहरात थरार- पिस्तुलचा धाक दाखवून सराफा व्यापाऱ्यास लुटण्याचा प्रयत्न; व्यापारी जखमी ​

१७ हजार ९७९ रुग्णांनी कोरोनाला हरविले 

रविवारी दिवसभरात विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयातील - १५, श्री गुरु गोविंदसिंघजी स्मारक जिल्हा शासकीय रुग्णालयातील - चार, मनपाअंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण कक्षातील- १०, किनवट- तीन, देगलूर दोन, बिलोली- एक व खासगी कोविड सेंटर मधील १० अशा ४५ कोरोना बाधितांनी कोरोनावर यशस्विरित्या मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत १७ हजार ९७९ रुग्णांनी कोरोनाला हरविले आहे. 

हेही वाचले पाहिजे- डॉ. रामराव महाराजांचे होते मोठे योगदान- अशोक चव्हाण ​

३५ जणांची प्रकृती गंभीर 

शनिवारी घेण्यात आलेल्या आरटीपीसीआर व अँन्टीजन टेस्ट किटद्वारे तपासणीसाठी घेण्यात आलेल्या स्वॅबमध्ये रविवारी नांदेड महापालीका क्षेत्रात - ३३, मुदखेड- एक, कंधार- चार, किनवट- तीन, देगलूर- एक, भोकर- तीन, लोहा- एक, धर्माबाद- दोन, माहूर- एक, हिमायतनगर - एक, बिलोली- तीन, हिंगोली- एक व परभणी- एक असे ५५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा १९ हजार १७४ वर गेला आहे. त्यापैकी १७ हजार ९७९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ५१४ बाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या ५३२ कोरोना बाधितांवर औषधोपचार सुरू असून, त्यापैकी ३५ जणांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. रविवारी रात्री उशिरापर्यंत ४५४ शंशयितांच्या स्वॅबची प्रयोगशाळेत तपासणी सुरू होती. 

कोरोना मीटर ः 

रविवारी पॉझिटिव्ह रुग्ण- ५५ 
रविवारी कोरोनामुक्त रुग्ण- ४५ 
रविवारी मृत्यू- एक 
एकूण पॉझिटिव्ह- १९ हजार १७४ 
एकूण कोरोनामुक्त- १७ हजार ९७९ 
एकूण मृत्यू- ५१४ 
उपचार सुरु- ५३२ 
गंभीर रुग्ण- ३५ 
स्वॅब अहवाल प्रलंबित- ४५४ 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NANDED: Out of 19000 patients, 97% of patients overcome corona On Sunday, 55 people tested positive 45 corona free Nanded News