esakal | नांदेडला १७ हजारांवर रुग्ण , दिवसभरात १५९ बाधित; दोन जणांचा मृत्यू 
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

गुरुवारी एक हजार ९८ अहवालापैकी ९१२ निगेटिव्ह तर १५९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या १७ हजार एवढी झाली असून यातील १३ हजार ६८७ बाधिताना औषधोपचारानंतर सुटी देण्यात आली

नांदेडला १७ हजारांवर रुग्ण , दिवसभरात १५९ बाधित; दोन जणांचा मृत्यू 

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड - मागील काही दिवसापासून जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा वाढलेला चिंताजनक आकडा तीन ते चार दिवसापासून आटोक्यात आल्याचे दिसून येत आहे. गुरुवारी (ता. आठ) कोरोना अहवालानुसार २११ कोरोना बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर १५९ व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत.
 
गुरुवारी एक हजार ९८ अहवालापैकी ९१२ निगेटिव्ह तर १५९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या १७ हजार एवढी झाली असून यातील १३ हजार ६८७ बाधिताना औषधोपचारानंतर सुटी देण्यात आली. सध्या दोन हजार ७६२ बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील ६५ बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. 

हेही वाचा- जिल्ह्यासाठी लवकरच ४० हजार कोरोना किट मिळणार - जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर​

२११ बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुटी 

उपचारा दरम्यान बुधवारी (ता. सात) विसावानगर नांदेड पुरुष (वय ७०), सिडको नांदेड पुरुष (वय ८५) या दोन रुग्णांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या ४४८ झाली आहे. आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय रुग्णालय १६, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी ३०, एनआरआय, पंजाब भवन, महसूल भवन, होम आयसोलेशन ८९, बिलोली सात, लोहा सहा, हदगाव तीन, माहूर तीन, मुखेड २२, हिमायतनगर एक, धर्माबाद तीन, किनवट तीन, अर्धापूर आठ, खासगी रुग्णालय १८, कंधार दोन असे २११ बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुटी देण्यात आली. 

हेही वाचले पाहिजे- नियमाला मिळाली शिथिलता ‘अन्’ कार्यालये ‘लॉक’

अशी आहे शासकीय रुग्णालयातील खाटांची स्थिती 

गुरुवारी बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड महापालिका क्षेत्रात ३४, मुदखेड तालुक्यात एक, नायगाव एक, हिंगोली एक, नांदेड ग्रामीण दोन, लोहा एक, उमरी एक असे एकुण ४१ तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड महापालिका क्षेत्र ४५, लोहा तालुक्यात नऊ, हदगाव ११, भोकर चार, मुदखेड एक, अर्धापूर एक, मुखेड १३, नांदेड ग्रामीण ११, किनवट सात, धर्माबाद दोन, कंधार एक, बिलोली चार, देगलूर सहा, नायगाव तीन असे ११८ बाधित आढळले. जिल्ह्यात दोन हजार ७६२ बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. सद्यस्थितीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे ५९ तर जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे ५० खाटा शिल्लक आहेत. 

नांदेड कोरोना मीटर 

एकुण पॉझिटिव्ह - १७ हजार 
एकूण कोरोनामुक्त - १३ हजार ६८७ 
एकूण मृत्यू - ४४८ 
आज प्रलंबित स्वॅब - ७०७ 
उपचार सुरु - दोन हजार ७६२ 
अतीगंभीर रुग्ण - ६५