esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

पनवेल- नांदेड रेल्वे

नांदेड-पनवेल एक्स्प्रेस पूर्ववत,मार्ग बदलून धावणार

sakal_logo
By
प्रमोद चौधरी

नांदेड : रेल्वे क्रमांक ०७६१४ नांदेड-पनवेल एक्स्प्रेस १४ ते २७ ऑक्टोबर दरम्यान, तर ०७६१३ पनवेल-नांदेड एक्स्प्रेस १५ ते २८ ऑक्टोबर दरम्यान रद्द करण्यात आली होती. परंतु, प्रवाशांची मागणी लक्षात घेता या एक्स्प्रेस मार्ग बदलून धावणार आहेत. रेल्वे क्र. ०७६१४ नांदेड-पवनेल एक्स्प्रेस पूर्वी प्रमाणेच नांदेड येथून सुटेल. परंतु १४ ते २७ ऑक्टोबर दरम्यान लातूर रोड, कुर्डूवाडी, मिरज, पुणे या मार्गाने (Nanded-Panvel Express) धावणार आहे. तसेच ०७६१३ पवनेल ते नांदेड एक्स्प्रेस देखील पूर्वीप्रमाणेच पनवेल येथून सुटून २८ ऑक्टोबर दरम्यान पुणे, मिरज, कुर्डूवाडी, लातूर रोड या मार्गाने धावेल. १४ ते २८ ऑक्टोबर दरम्यान मध्य रेल्वेमध्ये सोलापूर विभागातील भालवानी ते वाशिंबे दरम्यान २६.३३ किलोमीटरचे दुहेरीकरणाचे कार्य पूर्ण करण्याकरिता नॉन इंटर लॉक वर्किंग हाती (Nanded) घेण्यात येणार आहे.

हेही वाचा: सोयाबीनच्या भावात तीनशे रुपयांनी घसरण, शेतकऱ्यांना बसणार फटका

यामुळे काही गाड्यांवर याचा परिणाम झाला आहे. यापैकी नांदेड विभागातुन धावणारी पनवेल एक्स्प्रेसवरही त्याचा परिणाम होणार होता. परंतु, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी ही एक्सप्रेस मार्ग बदलून धावणार असल्याचे दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीने कळविले आहे.

loading image
go to top