Corona Update : नांदेडला बाधित रुग्ण बरे होण्याचा टक्का वाढतोय

प्रमोद चौधरी
Tuesday, 25 August 2020

नांदेड जिल्ह्यामध्ये दोन-तीन दिवसांपासून कोरोना बाधित रुग्ण औषधोपचार घेऊन बरे होण्याचा टक्का वाढत असल्याने, नांदेडकरांना दिलासा मिळत आहे.

नांदेड : जिल्ह्यात मंगळवारी २४० कोरोना बाधित रुग्णांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली. तसेच मंगळवारी प्राप्त ७०० अहवालापैकी १२६ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला असून, ५४७ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे तर चार रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. निळकंठ भोसीकर यांनी दिली.

कोरोना बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जिल्हामध्ये दररोज वाढत आहे. मंगळवारी (ता.२५) सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये जिल्ह्यात एकूण २४० कोरोना बाधित रुग्णांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली. तसेच चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे नवरंगपुरा कंधार येथील ५५ वर्षीय पुरुष, मालेगाव (ता.अर्धापूर) येथील ६० वर्षिय महिला तर चिंचाळा (ता.बिलोली) येथील ६० वर्षिय पुरुषाचा समावेश आहे. तसेच खासगी रुग्णालयामध्ये किनवट येथील ५२ वर्षिय पुरुषाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृत्यूची संख्या ही १९२ इतकी झाली आहे.

हेही वाचा - शालेय पुस्तके विक्रेत्यांचा व्यवसाय बुडाला, कशामुळे? ते वाचाच

मंगळवारी सायंकाळी ७०० अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ५४७ अहवाल निगेटिव्ह तर १२६ अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या पाच हजार २७६ झाली आहे. मंगळवारच्या तपासणीत आरटीपीसीद्वारे ५६ तर अॅटीजेन रॅपिड टेस्टद्वारे ७० असे एकूण १२६ पाॅझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. दरम्यान, उपचार सुरु असताना चार जणांचा मृत्यू झाला आहे. उपाचर सुरु असलेल्या कोरोना बाधित रुग्णांपैकी १८१ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याचे डाॅ. भोसीकर यांनी सांगितले.

हे देखील वाचाच -  जिप शाळांची पत आणि पट वाढविणारा अधिकारी

नांदेड कोरोना मीटर

 • एकूण सर्वेक्षण - एक लाख ५१ हजार १७२
 • एकूण घेतलेले स्वॅब - ३५ हजार ६५६
 • एकूण निगेटिव्ह स्वॅब - २८ हजार ५२५
 • एकूण पाॅझिटिव्ह रुग्ण - पाच हजार २७६
 • मंगळवारी पाॅझिटिव्ह रुग्ण - १२६ 
 • एकूण मृत्यू - १९२
 • मंगळवारी मृत्यू - ४
 • एकूण रुग्णालयातून सुटी दिलेले रुग्ण - तीन हजार ५३८
 • मंगळवारी सुटी दिलेले रुग्ण - २४०
 • सध्या रुग्णालयात उपचार सुरु असेलेले रुग्ण - एक हजार ५१०
 • मंगळवारी प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या - ८८
 • मंगळवारी गंभीर प्रकृती असलेले रुग्ण - १८१

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Nanded The Percentage Of Infected Patients Is Increasing